शनिवार, 27 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. आयटी
  3. आयटीच्या जगात
Written By
Last Modified: शुक्रवार, 29 जानेवारी 2016 (17:15 IST)

नेहमी एकाच रंगाचा टीशर्ट का वापरतो फेसबुकचा संस्थापक.

फेसबुकचे सीईओ मार्क झुकेरबर्ग यांचा व्हिडिओ तुम्ही अनेक वेळेस पाहिला असेल, मात्र झुकेरबर्ग तुम्हाला नेहमीच फिक्कटरंगाच्या टी-शर्टमध्येच दिसतील. हा रंग आणि टीशर्ट आता त्यांची ओळख झाली आहे. हाच टी शर्ट घालून ते आता ऑफिसला जातात. झुकेरबर्गने याविषयीचं रहस्य उघड केलं आहे, झुकेरबर्गने आपल्या वॉर्डरोबचा एक फोटो फेसबुकवर पोस्ट केला आहे, यात सारे कपडे एकाच रंगाचे आहेत. झुकेरबर्ग 2014 मध्ये सीईओ झाले होते तेव्हा हा प्रश्न उपस्थित झाला होता, तेव्हा त्यांनी यावर उत्तर दिलं होतं. यावर झुकेरबर्ग म्हणाला होता, माझ्याजवळ एकच टीशर्ट आहे, असं नाही, तर माझ्याजवळ एकाच रंगाचे अनेक टीशर्ट आहेत. टीशर्टचा रंग सांगतो की, आपण समाजाबद्दल असलेल्या कर्तव्यांबद्दल कसा विचार करतो. तसेच टीशर्टचा रंग सारख्या लहान गोष्टीत आपण, आपला वेळ घालवत नाही, की ज्या लहान-लहान गोष्टींना जीवनात काहीच महत्त्व नाही.