शुक्रवार, 26 एप्रिल 2024
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. आयटी
  4. »
  5. आयटीच्या जगात
Written By wd|
Last Modified: नवी दिल्ली , बुधवार, 30 एप्रिल 2014 (11:35 IST)

नोकियाच्या सीईओपदी राजीव सुरी

जगातील अग्रेसर मोबाइल कंपनी नोकियाने मुख्य कार्यकारी अधिकारीपदी (सीईओ) राजीव सुरी या भारतीय व्यक्तीची निवड केली आहे. नोकिया मोबाइल नुकताच मायक्रोसॉफ्ट कंपनीत विलीन करण्यात आला.

राजीव सुरी हे भारतीय नागरिक असून ते 1995पासून नोकियामध्ये कार्यरत आहेत. त्यांचा 20 वर्षांचा अनुभव लक्षात घेता, नोकिया आपला मोर्चा आता 'वायरलेस नेटवर्क उपकरण' निर्मितीच्या क्षेत्रात वळवणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. एकेकाळी नोकियाचा 'वायरलेस नेटवर्किंग' विभाग तोटय़ात होता. मात्र खर्चकपातीची आणि तोटय़ात असलेले विभाग बंद करण्याची कठोर उपाययोजना करून सुरी यांनी या युनिटला भरघोस नफा कमावून दिला.