शुक्रवार, 26 एप्रिल 2024
  1. वृत्त-जगत
  2. आयटी
  3. आयटीच्या जगात
Written By
Last Modified: शुक्रवार, 5 जून 2015 (17:46 IST)

'फेसबुक लाइट' लाँच, आता स्लो नेटवर्कवर फास्ट चालेल फेसबुक!

सोशल नेटवर्किंग वेबसाइट फेसबुकने आपले नवीन एप 'लाइट' लाँच केले आहे. 'फेसबुक लाइट' नावाच्या या ऐपच्या माध्यमाने खास करून  ऐंड्रॉयड यूजर्स स्लो मोबाइल नेटवर्कवर बीनं व्यत्यय फेसबुक चालवू शकतात.  
 
कंपनीचा असा दावा आहे की 'फेसबुक लाइट' फार फास्ट आहे जो सर्वात कमी इंटरनेट स्पीडवर पण फेसबुकच्या स्पीडला प्रभावित करणार नाही. तसेच, या अॅपच्या वापरामुळे इंटरनेटची खपतपण कमी होईल.  
 
कंपनीने या नवीन ऍप्लिकेशनला सध्या आशियामध्ये सुरू केले आहे. फेसबुक या अॅपला येणार्‍या आठवड्यात युरोप समेत आफ्रिका, लॅटिन अमेरिकेत सुरू करणार आहे. हे अॅप्लिकेशन प्ले स्टोरमध्ये उपलब्ध होईल.  
 
फेसबुकचे संस्थापक मार्क जुकरबर्गने आपल्या एका फेसबुक पोस्टावर लिहिले, 'आम्ही फेसबुक लाइट नावाचे एक अॅप्लिकेशन लाँच केला आहे, या नवीन अॅपच्या माध्यमाने जगभरातील हळू मोबाइल नेटवर्क आणि ऐंड्रॉयड फोन यूजर्स जलद स्पीडसोबत फेसबुकचा आनंद घेऊ शकतील.'