शनिवार, 27 एप्रिल 2024
  1. वृत्त-जगत
  2. आयटी
  3. आयटीच्या जगात
Written By
Last Modified: बुधवार, 10 जून 2015 (15:53 IST)

फेसबुकचं नवं फीचर, इमेजही पोस्ट करू शकता

फेसबुकने आपल्या न्यूज फीडमध्ये एका नव्या फीचरचा समावेश केला आहे. आतापर्यंत ग्राफ्रिक इंटरचेंज फॉरमॅटमधील (GIF) इमेज फेसबुकवर पोस्ट करता येत नव्हतं, मात्र आता ते शक्य होणार आहे. फेसबुकच्या या नव्या फीचरमुळे फेसबुक युजर्समध्ये आनंदाचं वातावरण आहे. फेसबुकवर अँनिमेटिड GIF सपोर्ट करू शकणार आहे, अशी माहिती फेसबुकच्या प्रवक्त्यांनी दिली. त्यामुळे यापुढे युजर्स आपल्या मित्रांना जीआयएफ इमेज शेअर करू शकणार आहेत.
 
या नव्या फीचरचं अपडेट अद्याप सुरु झालं नाही. त्यामुळे या फीचरचा वापर करायचा असल्यास जिफी, इमगर, टम्बलरसारख्या वेबसाईटस्वरुन स्टेटस अपडेट ऑक्समध्ये इमेज पेस्ट करु शकतात आणि पब्लिश करु शकतात. GIF इमेज करंट ऑटो प्ले सेटिंग्जसोबत फेसबुकवर ऑटो प्ले होऊ शकणार आहे. मात्र जर तुमच्या फेसबुक अकाऊंटच्या सेटिंग्जमध्ये डिझेबल ऑटो प्ले असे असेल, तर जीआयएफ इमेजवर क्लिक करावं लागेल.