शुक्रवार, 26 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. आयटी
  3. आयटीच्या जगात
Written By
Last Modified: बुधवार, 23 सप्टेंबर 2015 (12:08 IST)

फेसबुकची आता वाय-फाय सेवा

फेसबुक यूजरसाठी नित्य नवे काही तरी घेऊन येते. फेसबुकवर लाइकसारखाच डिसलाइक हा देखील पर्याय आता उपलब्ध होणार आहे. त्याबरोबर फेसबुक विशेष वाय-फाय सेवा भारतामध्ये सुरू करण्याच्या विचारात आहे. फेसबुकचे मोबाइल आणि ग्लोबल अँक्सेस पॉलिसीचे केव्हीन मार्टिन यांनी इंडिया इकॉनॉमिक कन्व्हेन्शन 2015 मध्ये नुकतीच ही माहिती दिली. ही इंटरनेट सेवा कमी किमतीत उपलब्ध असणार आहे. आपल्या नियोजनावर फेसबुक ठाम असून देशामध्ये इंटरनेटचे जाळे विस्तारणसाठी ही अजून एक नवी कल्पना फेसबुक अमलात आणणार आहे.
 
ही विशेष वाय-फाय सेवा कार्यान्वित करण्यासाठी फेसबुक ड्रोन आणि मानवरहित विमानांचा आधार घेणार आहे. इंटरनेटसाठी आवश्यक मूलभूत गोष्टीही ज्यांच्याकडे नसतील त्यांच्यासाठी माफक दरात इंटरनेट पुरवण्याचा विचार आहे. मार्टिन म्हणाले, माफक दरातील वाय-फाय सेवा आम्ही सुरू करीत आहोत. किमतीबाबत इतर देशांमध्ये चर्चा सुरू असून भारतामध्ये ही सेवा करण्याच्या विचारात आम्ही आहोत. फेसबुकची इंटरनेटची सेवा कुठलही जाहिराती आणि व्हिडिओशिवाय सुरू होणार आहे.
 
फेसबुकने देशात माफक दरामध्ये इंटरनेट सुविधा सुरू करण्याचा मनोदय व्यक्त केला आहे. त्याला देशातून विरोध झाला. नेट न्यूट्रॅलिटी तत्त्वाचा भंग होत असल्यामुळे देशामध्ये ही सुविधा कार्यान्वित झाली नाही. इतर देशांमध्ये मात्र फेसबुकला या गोष्टी करता आल्या. आताही माफक दरामध्ये वाय-फाय सुविधेचा वापर कदाचित इतर देशांमध्ये सुरू होईल. भारतामध्ये विशेष वाय-फाय सेवा सुरू करण्यासाठी फेसबुक उत्सुक असले तरी त्याबद्दल खात्री देता येणार नाही. फेसबुक सुरू करीत असलेल्या नव सुविधांवर नजर टाकली तर यूजरसाठी सतत काही ना काही करण्याचा फेसबुकचा प्रयत्न दिसून येतो.