शुक्रवार, 26 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. आयटी
  3. आयटीच्या जगात
Written By
Last Modified: सोमवार, 5 ऑक्टोबर 2015 (11:29 IST)

फेसबुकवर व्हिडिओ डीपी

फेसबुकच्या मोबाइल व्हर्जनमध्ये आता प्रोफाइल पिक्चरऐवजी एखादी व्हिडिओ क्लिप अपलोड करता येणार आहे. मोबाइल युजर्सच्या माध्यमातून अधिक महसूल मिळतो, हे लक्षात आल्यामुळे फेसबुकने आपल्या मोबाइल व्हर्जनमध्ये नवे बदल करण्याचे ठरवले आहे. फेसबुक प्रोफाइल पिक्चरऐवजी आता एखादी व्हिडिओ क्लिप अपलोड करता येणार आहे. या नव्या बदलांमुळे फेसबुकचा वापर मोठय़ा प्रमाणात वाढेल, असा विश्वास कंपनीला वाटतो आहे. प्रोफाइल व्हिडिओसोबतच तात्पुरत्या स्वरूपात प्रोफाइल पिक्चर टाकण्याचा पर्यायसुद्धा फेसबुक युजर्ससाठी उपलब्ध राहणार आहे. एखाद्या विशिष्ट प्रसंगानिमित्त किंवा एखाद्या इव्हेंटच्या प्रमोशनसाठी विशिष्ट कालावधीसाठी नवे प्रोफाइल पिक्चर टाकता येईल आणि दिलेली मुदत संपली की आपोआपच जुने प्रोफाइल पिक्चर पुन्हा अपलोड होईल. प्रोफाइलमधील कुठली माहिती सार्वजनिक करावी आणि कुठली माहिती फ्रेण्डस्ना दिसावी, याबाबत प्रायव्हसी सेटिंग्जमध्येसुद्धा काही महत्त्वाचे बदल करण्यात आले आहेत. 83 टक्के फेसबुक युजर्स फेसबुकवरून 80 विविध भाषांमध्ये संवाद साधतात. त्यामुळे एखादे नाव विविध प्रकारांनी उच्चरले जाऊ शकते. उच्चराबाबतची अडचण दूर करण्यासाठी फेसबुकमध्ये प्रोनाऊन्सिएशन गाइड उपलब्ध आहे. यासाठी प्रोफाइलमधील ‘अबाऊट’ सेक्शनमध्ये जाऊन ‘डीटेल अबाऊट यू’ येथे आपल्या नावाचा उच्चर सेट करता येतो. फेसबुक तुमच्या नावाच्या योग्य उच्चराविषयी पर्याय सुचवेल.