शनिवार, 27 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. आयटी
  3. आयटीच्या जगात
Written By
Last Modified: सोमवार, 18 जानेवारी 2016 (11:52 IST)

फेसबुकवरून प्रेम आणि तुरुंगवारी

फेसबुकनं तुम्हाला शेकडो मित्र दिले. नवी नाती दिली. पण हेच फेसबुक तुमच्या आयुष्यात तुरुंगवास घेऊन आलं तर? उमरेडच्या आणि नगरच्या तरुण-तरुणीची फेसबुकवर ओळख झाली. पण त्यापुढं जाऊन त्यांनी केलेल्या कारनाम्यामुळं त्यांना गजाआड व्हावं लागलं. उमरेडची ती. वय अवघं 19 .आणि अहमदनगरचा तो. वय 23 वर्र्ष. दोघंही उच्चशिक्षित. फेसबुक वेडेच.तिने प्रोफाईल पिक्चर म्हणून आलिया भट्टचा फोटो ठेवलेला. तर त्यानं सलमान खानचा. अचानक दोघांच्या फेसबुकवर गप्पा सुरु झाल्या. एके दिवशी आलियानं सलमानच्या मोबाइलवर मिस्ड कॉल दिला. त्यानं तातडीनं फोन केला. नवीन वर्षात दोघांनी भेटण्याचे ठरविले. मग तोही 800 किमीचा प्रवास करून उमरेडला पोहोचला आणि उमरेड बसस्थानकावर त्यांची पहिली भेट झाली. 5 जानेवारीला सलमान उमरेडला पोहोचला. दोघांची नजरानजर झाली.आणि तिथंच लग्नाचा बेत ठरला. दोघांनीही थेट शिर्डी गाठली. इकडं आलियाच्या वडिलांनी मुलगी हरवल्याची पोलिसात तक्रार दिली. पण शिर्डीत वेगळाच कट शिजला. आलियानं सलमानला अपहरणाचा बनाव रचायला सांगितलं. आणि वडिलांकडे 2 लाखांची खंडणी मागण्याचा सल्ला दिला. सलमानही आलियाच्या वडिलांना फोन करुन धमकावलं. आलियाचे वडील पोलिसात गेले. पोलिसांनी फोन कॉल ट्रेस करून दोघांना शिर्डीतून शोधून काढलं. सोशल मीडियाच्या फसव्या जगानं दोघांनाही गजाआड व्हावं लागलं. हवा, पाणी जितकं गरजेचं आहे, तितकी निकड तरुणांनी सोशल नेटवर्किगची करुन ठेवली. पण त्याचा गैरवापर झाला तर काय होऊ शकतं याचं उत्तम उदाहरण म्हणजे आलिया आणि सलमानचं प्रकरण. त्यामुळं सावध राहा.