शनिवार, 27 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. आयटी
  3. आयटीच्या जगात
Written By
Last Modified: सोमवार, 25 एप्रिल 2016 (12:51 IST)

या नंबरवरुन फोन आला तर तो कधीही उचलू नका!

भारतात हेरगिरी करण्यासाठी पाकिस्तान नवीन नवीन फंडे वापरत आहे. यासाठी त्यांनी भारतीय मोबाइल कंपन्यांचा आसरा घेतलाय. तुम्हाला लकी ड्रॉ लागल्याचे आमिष  दाखविण्यात येत आहे. यातून त्यांचा मोबाइल डाटा हॅक केला जात आहे. 
 
त्यामुळे तुम्ही अडचणीत येऊ शकता. काही दिवसांपासून मोबाइलवर पाकिस्तानी नंबर +92-3004989471 वरुन आलेला कॉल घेऊ नका. तुम्हाला लकी ड्रॉच्या नावाखाली जाळ्यात ओढले जाईल. दरम्यान, तुम्हाला 25 लाखांची लॉटरी लागल्याची माहिती दिली जाईल. त्यानंतर तुमचा फोन कट होईल. 
 
तुम्ही पुन्हा कॉल केला तर तुम्हाला 5 अंकाचा एक नंबर दिला जाईल. ते केवळ चेक करण्याच्या नावाखाली तुमचा मोबाइल डाटा हॅक करण्यासाठी. तुम्ही त्याला बळी पडू नका. जर तुम्ही पुन्हा त्याच नंबरला कॉल केला तर तुमचा मोबाइल अचानक बंद होईल आणि मोबाइल डाटा हॅक होईल. याबाबत सतर्कता बाळगा. ट्रुकॉलर तुमच्याकडे असेल तर तुम्हाला कोठून फोन आलाय ते समजेल. पाकिस्तानातून जर नंबर आला तर तुम्ही तो कधीही उचलू नका किंवा परत करु नका.