शुक्रवार, 26 एप्रिल 2024
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. आयटी
  4. »
  5. आयटीच्या जगात
Written By वेबदुनिया|

सावधान! फेसबुक, ट्‍विटरचा 'पासवर्ड' सांभाळा

WD
सोशल नेटवर्किंग साइट 'फेसबुक' तसेच गुगल आणि मायक्रो ब्लॉगिंग साइट 'ट्‍विटर'वरील 20 लाख युजर्सचे 'पासवर्ड'ची चोरी झाल्याचे एका एका सर्वेक्षणातून उघडकीस आले आहे.

'ट्रस्टवेव्ह स्पाइडरलॅब्स'नुसार, 'सायबर गुन्हेगारांनी नेदरलॅंण्ड येथील एका सर्व्हरमधील माहिती चोरत असल्याचे आढळून आले आहे. सायबर गुन्हेगार 'पॉनी बोटनेट'द्वारे सर्व्हरमध्ये प्रवेश करून सोशल नेटवर्किंगसाठी प्रसिद्ध असलेल्या साइटमधील युजर्सचे पासवर्ड चोरतात.

जगभरात 90 हजार पेक्षा जास्त कंपन्या विविध संकेतस्थळांना सर्व्हरची सेवा पुरवतात. सायबर गुन्हेगार या सर्व्हरवर कब्जा मिळवून विविध प्रकारची माहिती चोरतात. सायबर गुन्हेगारांनी फेसबुकवरील तीन लाख 20 हजार, गुगलवरील 60 हजार, याहू 59 हजार व 22 हजार ट्‍विटरधारकांचे पासवर्ड चोरले आहेत. पासवर्डची चोरी झालेले युजर्स हे अमेरिका, जर्मनी, सिंगापूर, थायलंड व इतर देशांमधील आहेत.