शुक्रवार, 26 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. आयटी
  3. आयटीच्या जगात
Written By
Last Modified: बुधवार, 16 डिसेंबर 2015 (10:55 IST)

सुपरकॉम्पुटर करतो मृत्यूचे भाकीत

इस्त्रालमधील एका सुपरकॉम्पुटरमध्ये दर तीन मिनिटाला रुग्णांच्या आरोग्याशी संबंधित आकडेवारी एकत्र केली जाते. त्यामध्ये शरीरातील ऑक्सिजनच्या पातळीपासून ते रक्तदाबापर्यंत अनेक बाबींचा समावेश असतो. या सुपरकॉम्पुटरमध्ये गेल्या तीस वर्षाच्या काळात अडीच लाखांपेक्षाही अधिक लोकांशी संबंधित माहिती साठवण्यात आली आहे. या माहितीच्या आधारे हा सुपरकॉम्पुटर एखाद्या व्यक्तीचा मृत्यू कधी होऊ शकतो याबाबत 96 टक्क्यांपर्यंत अचूक भाकीत करू शकतो, असा संशोधकांचा दावा आहे.
 
द बेथ इस्त्रायल डिकोन्सेस मेडिकल सेंटरने या सिस्टीमच्या मॉनिटर्सना आपल्या रुग्णांशी जोडले आहे. डॉक्टरांपेक्षाही हा सुरपकॉम्पुटर एखाद्या रोगाचे निदान अधिक लवकर आणि अचूक करू शकतो, असे म्हटले जाते. हा सुपरकॉम्पुटर मोठय़ा आकडेवारीचा एक खजिनाच आहे. डॉ. स्टीव्ह हार्ग या योजनेचे प्रमुख आहेत. एखाद्या माणसाच्या आरोग्याविषयीची सर्व माहिती या सुपरकॉम्पुटरच्या साहाय्याने गोळा करता येते, असे त्यांनी सांगितले. अशा माहितीमधून संबंधित माणसाला कोणता आजार होऊ शकतो व त्यावर कसे उपचार होऊ शकतात हे सांगता येते. या कृत्रिम बुध्दीच्या साहाय्याने डॉक्टर आपल्या रुग्णावर अधिक चांगल्या प्रकारे उपचार करू शकतात.