शुक्रवार, 26 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. आयटी
  3. आयटीच्या जगात
Written By

हे पासवर्ड कधीच ठेवू नका...

सोशल मीडियामध्ये फेसबुकचा वापर खूपच लोकप्रिय ठरत आहे. परंतु यामुळे अनेक गुन्हे घडत आहेत. मात्र यामुळे याचा वापर बंद करणेही शक्य नाही. यासाठी सुरक्षित फेसबुकच्या वापरासाठी तुम्ही तुमचा पासवर्ड स्ट्राँग ठेवणे आवश्यक आहे. अनेकजण काही कॉमन पासवर्ड ठेवतात. यासंबंधी धक्कादायक माहिती संशोधनातून समोर आली आहे. 
 
फेसबुक वापरत असताना आपल्या पाळीव प्राण्याचे नाव पर्सनल डिटेल्समध्ये वापरू नका. कारण, नुकत्याच केलेल्या अभ्यासावरून असे लक्षात आले आहे की, जवळपास सहापैकी एकजण स्वत:च्या अकाउंटचा पासवर्ड म्हणून पाळीव प्राण्याचे नाव ठेवतात. 
 
याचप्रमाणे पालकांचे नावही डिटेल्समध्ये अँड करू नका. यामुळे तुम्हाला काही अडचणी येऊ शकतात. 
 
तसेच तुमची जन्मतारीख आणि तुमच्या शाळेचे डिटेल्सही माहितीमध्ये अँड करू नका. तुम्ही जर तुमच्या कुटुंबाबरोबर फिरायला जाणार असाल, तर फिरुन आल्याशिवाय त्याचे अपडेट टाकू नका. कारण फिरायला जाण्यापूर्वीच अपडेट केल्याने क्रिमीनल्सना माहिती मिळते. यामुळे पोस्टच करायची असेल तर ती ट्रिपवरुन आल्यानंतर करा. 
 
तज्ज्ञांच्या मते, सेल फोन्सवरून ट्विटर कधीच वापरू नये. कारण सेल फोनवरून ट्विट केल्याने तुम्ही कोठे आहात आणि कोणत्या रस्त्यावर आहात, याचीही माहिती लोकांना मिळते. काहीवेळेस तुमच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने हे धोक्याचे ठरू शकते. 
 
एक नवीन ई-मेल आयडी तयार करा आणि सोशल साईटस्साठी तो अँड्रेस वापरा. कोणत्याही परिस्थितीत कोणत्याही सोशल साईटवर तुमचे पर्सनल मेल्स लिंक करू नका. कारण यामुळे तुमच्या अकाउंटला धोका निर्माण होऊ शकतो.