शुक्रवार, 26 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. आयटी
  3. आयटीच्या जगात
Written By
Last Modified: नवी दिल्ली , गुरूवार, 9 जुलै 2015 (12:32 IST)

‘MyGov’ अॅप लवकरच देशातील सर्व भाषांमध्ये उपलब्ध होणार

MyGov अॅप लवकरच देशातील सर्व भाषांमध्ये उपलब्ध होणार आहे. मोदी सरकारच्या महत्वाकांक्षी ‘डिजिटल इंडिया मिशन’ची सुरुवात या MyGov’ अॅपच्या लॉन्चिंगने झाली होती. सध्या या अॅपवरील सर्व माहिती इंग्रजी भाषेतच उपलब्ध आहे.
 
या अॅपच्या माध्यमातून देशातील जनता थेट मोदी सरकारशी जोडली जाणार आहे. जनतेला सरकारच्या निर्णयांमध्ये थेट सहभागी होता येणार आहे. त्यामुळे या अॅपवरील सर्व माहिती, सूचना देशातील सर्व भाषांमध्ये उपलब्ध करण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरु झाले आहेत. अँड्रॉईडवर सपोर्ट करणाऱ्या या अॅपचं लॉन्चिंग 1 जुलैला दिल्लीत पार पडलेल्या ‘डिजिटल इंडिया वीक’च्या कार्यक्रमात करण्यात आलं होतं.
 
कोलकत्यातील ‘IndusNet टेक्नोलॉजी’ या आयटी कंपनीने ‘MyGov’ हे मोबाईल अॅप तयार केले आहे. विशेष म्हणजे MyGov अॅप इन्स्टॉल झाल्यावर गूगल अॅप स्टोअरवर 4.5 रेटिंगही मिळाली आणि लॉन्चिंगनंतर अगदी काही तासांतच हजारहून अधिक इन्स्टॉलेशनही झाले होते.