शुक्रवार, 26 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. आयटी
  3. आयटीच्या जगात
Written By
Last Modified: शुक्रवार, 10 जुलै 2015 (11:33 IST)

’फ्लिपकार्ट’ वेबसाइट बंद करणार!

Myntra.com नंतर आता फ्लिपकार्टनंही आपली वेबसाइट बंद करण्याचा निर्णय घेतलाय. लवकरच ही शॉपिंग वेबसाइट केवळ मोबाइल अँपच्या स्वरूपात ग्राहकांच्या सेवेत येणार आहे. Myntra.com नं काही दिवसांपूर्वी घेतलेल्या या निर्णयामुळे ई-बिझनेस क्षेत्राला पहिल्यांदा धक्काच बसला होता. पण, Myntra नं घेतलेल्या या निर्णयानंतर अवघ्या दोन महिन्यांच्या आतच फ्लिपकार्टनंही त्यांच्या पायावर पाय ठेवण्याचा निर्णय घेतलाय. फ्लिपकार्टचा मुख्य प्रॉडक्ट अधिकारी असलेल्या पुनित सोनी यांनी दिलेल्या माहितीनुसार, सप्टेंबर महिन्यापासून फ्लिपकार्ट केवळ मोबाइल अँपवरच काम करणार आहे.
 
फ्लिपकार्टचं हे पाऊल स्मार्टफोन आणि मोबाइल इंटरनेटच्या बिझनेस वाढवण्यासाठीही मोठा हातभार लावणार आहे. सध्या फ्लिपकार्टचे 45 दशलक्ष रजिस्टर्ड यूजर्स आहेत. या वेबसाइटला दररोज जवळपास 10 दशलक्ष लोक भेट देतात.