शनिवार, 22 फेब्रुवारी 2025
  1. धर्म
  2. सण-उत्सव
  3. जन्माष्टमी
Written By
Last Modified: शुक्रवार, 19 ऑगस्ट 2022 (18:40 IST)

Janmashtami : नाव घेत सावळ्याचे, कृष्ण रूप झाल्या

कृष्ण मंजिऱ्याच त्या जवळजवळ आल्या,
नाव घेत सावळ्याचे, कृष्ण रूप झाल्या,
कुणी शरीर झाल्या,कुणी चेहरा,
गुंतून एकमेकांत त्या आल्या आकारा 
शोधावा कुठं श्याम, मंजिरीत की कसा,
एकरूप दोन्हींही जाहले,कित्ती भरवसा,
आले जीवन त्यांचे ही कामी, अर्थ त्यास आला,
मंजिरी मजिरीतून "कृष्ण"नाद येऊ लागला!
...अश्विनी थत्ते