रविवार, 29 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. खेळ मराठी
  3. प्रो कबड्डी 2021
Written By
Last Modified: मंगळवार, 1 फेब्रुवारी 2022 (17:21 IST)

प्रो कबड्डी लीग :यूपी योद्धा VS बेंगळुरू बुल्स

युपी योद्धा 1 फेब्रुवारीला बेंगळुरू बुल्स विरुद्धच्या महत्त्वपूर्ण मुकाबल्यात विजयाचे लक्ष्य ठेवणार आहे. पॉइंट टेबलमध्ये सध्या 7व्या क्रमांकावर असलेल्या युपी वॉरियर्सचा सामना दुसऱ्या स्थानावर असलेल्या बेंगळुरू बुल्सशी होत आहे. हा सामना युपी योद्धासाठी या हंगामात त्यांची प्ले-ऑफची स्वप्ने जिवंत ठेवण्यासाठी केवळ महत्त्वाचा ठरणार नाही तर सलग दोन पराभवानंतर त्यांचा गमावलेला आत्मविश्वास वाढविण्यातही मदत करेल.
 
आतापर्यंत सुरेंदर गिल हा यूपी योद्धाचा स्टार खेळाडू आहे, त्याने अनेक प्रसंगी महत्त्वपूर्ण गुण मिळवले आणि संघाला वाचवले. त्याचे सहकारी रेडर परदीप नरवाल आणि श्रीकांत जाधव यांच्या चांगल्या पाठिंब्याने त्याच्या कामगिरीचे खूप कौतुक होत आहे. UP योद्धाचा बेंगळुरू बुल्स विरुद्धचा सामना 1 फेब्रुवारी 2022 रोजी स्टार स्पोर्ट्स नेटवर्क आणि हॉटस्टारवर रात्री 8:30 वाजता (IST) थेट प्रसारित केला जाईल.

युपी योद्धा मात्र आत्मविश्वासाने मॅटवर उतरेल कारण शेवटच्या वेळी दोन संघ एकमेकांशी भिडले होते, योद्धाने बुल्सचा 42-27 असा पराभव केला. सुरेंदर गिल (5 गुण), सुमित (4 गुण) आणि नितेश कुमार (3 गुण) यांच्या साथीने एकट्याने 15 गुण मिळवत रेडर श्रीकांत जाधव या सामन्यातील स्टार ठरला. 
सामन्या पूर्वी युपी योद्धाचे मुख्य प्रशिक्षक जसवीर सिंह म्हणाले , प्ले ऑफच्या स्वप्नांना राखून ठेवण्यासाठी हा मॅच आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहे. मागील 2 सामन्यात होणाऱ्या चुकांना दूर करण्यासाठी आमच्या खेळाडूंनी खूप मेहनत केली आहे. आंम्ही उत्कृष्ट खेळी करू.