शनिवार, 27 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. लोकसभा निवडणूक 2019
  3. लोकसभा निवडणूक 2019 राजकीय पक्ष
Written By

काँग्रेस: स्वातंत्र्य चळवळीपासून ते सत्ताच्या शिखरापर्यंत

28 डिसेंबर 1885 रोजी भारतातील प्रमुख राजकीय पक्षांपैकी एक, काँग्रेस याची स्थापना झाली. त्याची स्थापना इंग्रज एओ ह्यूम (थिओसॉफिकल सोसायटीचे मुख्य सदस्य) यांनी केली. दादा भाई नौरोजी आणि दिनशा वाचा देखील संस्थापकांमध्ये सामील होते. संघटनाचे पहिले अध्यक्ष व्योमेशचंद्र बॅनर्जी हे होते.
 
त्यावेळी काँग्रेसच्या स्थापनेचा मुख्य उद्देश भारताचे स्वातंत्र्य होते, पण स्वातंत्र्यानंतर हे भारताचे मुख्य राजकीय पक्ष बनले. तथापि, स्वातंत्र्यानंतर महात्मा गांधी म्हणाले होते की काँग्रेसच्या स्थापनेचा उद्देश पूर्ण झाला आहे, म्हणून हे आता संपवले पाहिजे. 
 
स्वातंत्र्यापासून 2014 पर्यंत 16 सामान्य निवडणुकांपैकी 6 मध्ये काँग्रेसने पूर्ण बहुमत मिळविले, जेव्हा की 4 वेळा सत्तारूढ युतीचे नेतृत्व केले. भारतीय लोकशाहीच्या इतिहासात काँग्रेस सर्वाधिक काळापर्यंत सत्तावर काबीज होती. 
 
पहिल्या निवडणुकीत काँग्रेसने 364 जागा जिंकून प्रचंड बहुमत मिळविले, परंतु 16व्या लोकसभेत ही पार्टी 44 जागांवर मर्यादित झाली.
 
आश्चर्य म्हणजे 16व्या लोकसभेत काँग्रेस नेता प्रतिपक्ष बनण्यासाठी देखील पात्र ठरली नाही. सध्या काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी आहे. यापूर्वी पंडित जवाहर नेहरू, कामराज, नीलम संजीव रेड्डी, इंदिरा गांधी, पी. व्ही. नरसिंहा राव, सीताराम केसरी, राजीव गांधी, सोनिया गांधी इत्यादी अध्यक्ष राहून चुकले आहे. पार्टीचे निवडणूक चिन्ह हाताचा पंजा असे आहे. यापूर्वी बैल जोडी आणि गाय-वासरे देखील काँग्रेसचे प्रतीक राहिले आहे.
 
या पक्षास देशाला 7 पंतप्रधान देण्याचा श्रेय आहे. यात पंडित नेहरू, गुलजारिलाल नंदा ((कार्यवाहक पंतप्रधान), लाल बहादूर शास्त्री, इंदिरा गांधी, राजीव गांधी, पी. व्ही. नरसिंहा राव आणि मनमोहन सिंग आहे. मनमोहन सिंगने 2004 ते 2014 पर्यंत काँग्रेस नेतृत्वाखालील यूपीएच्या युती सरकारचे नेतृत्व केले होते. काँग्रेस पक्षाच्या काळात 1975 मध्ये देशात आणीबाणी हे एक कलंक देखील आहे. त्या वेळी श्रीमती इंदिरा गांधी या पंतप्रधान होत्या.