सोमवार, 6 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. लोकसभा निवडणूक 2019
  3. लोकसभा निवडणूक 2019 बातम्या
Written By
Last Modified: गुरूवार, 18 एप्रिल 2019 (17:17 IST)

एका ‘बापा’च्या 48 मुलांनी आज मतदानाचा हक्क बजावला

अमरावती येथे ही घटना घडली आहे. यामध्ये एका ‘बापा’च्या तब्बल 48 मुलांनी आज मतदानाचा हक्क बजावला आहे. त्या सर्वांनी सोबत मतदान केले आहे. शंकरबाबा पापडकर यांच्या 48 मुलांनी अमरावती येथील परतवाडा इथे मतदान केले आहे.

काय आहे नेमकी या मोठ्या मनाच्या बापाची काहाणी, तर लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात विदर्भातील अमरावती, अकोला, बुडणाला मतदारसंघात मतदान सुरु असून, अमरावती येथील परतवाडा मतदान केंद्रातील 48 मुलांच्या वडिलांचं एकच नाव आहे. यामध्ये जेव्हा कधीतरी रस्त्यावर टाकलेल्या या मुलांना शंकर बाबा पापडकर यांनी आपले पालकत्व दिलं आहे. त्यांनी दिव्यांग मुलांना माणूस म्हणून जगवलं सोबतच लोकशाहीत प्रत्येकाला असलेला मतदानाचा अधिकार मिळवून दिला आहे. त्यांनी पुढाकार घेवून या सर्वांचे मतदान कार्ड बनवले, या सर्व 48 दिव्यांगं मतदारांना वडील म्हणून स्वत:चं नाव दिल असून आम्ही मतदान करणार, मग तुम्ही का नाही? असा प्रश्न हे दिव्यांग मतदार विचारत आहेत. त्यामुळे या बापाची चर्चा सध्या सर्वत्र सुरु असून त्यांच्न्या या कामाला सर्व सलाम करत आहेत.