बुधवार, 27 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. लोकसभा निवडणूक 2019
  3. लोकसभा निवडणूक 2019 बातम्या
Written By
Last Modified: मंगळवार, 9 एप्रिल 2019 (09:12 IST)

अनिल गोटे यांचा भाजपला जय महाराष्ट्र लढणार अपक्ष लोकसभा

धुळे जिल्ह्यातील नाराज आमदार अनिल गोटेंनी भाजप पक्षाला सोडचिट्ठी दिली आहे. पक्षाच्या सदस्यत्वाचा आणि आमदारकीचा राजीनामा दिला असून, अनिल गोटेअपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. त्यामुळे धुळ्यात भाजपाचे नेते आणि केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे यांच्या अडचणी वाढणार असून त्यामुळे निवडणूक चुरशीची होणार आहे.
 
काही महिन्यांपासून अनिल गोटे पक्षावर नाराज होते. त्यामुळेच त्यांनी आज पक्ष सदस्यत्व आणि आमदारकीचा राजीनामा दिला. प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्याकडे त्यांनी पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा पाठवला आहे. विधानसभेच्या अध्यक्षांकडे आमदारकीचा राजीनामा पाठवला आहे. लोकसभा निवडणुकीसाठी अपक्ष उमेदवारी अर्ज भरणार असून, त्यामुळे भाजपाचे उमेदवार सुभाष भामरे यांना आव्हान निर्माण झाले आहे. गोटे यांना स्थानिक राजकारणात  महत्त्वं दिलं जात नसल्यानं गोटे पक्षापासून दूर गेले होते. जलसंपदा गिरीश महाजन यांच्या वाढत्या प्राबल्यामुळे गोटे नाराज होते. डिसेंबरमध्ये झालेल्या धुळे महापालिकेच्या निवडणुकीत गोटे यांनी लोकसंग्राम पक्षाची स्थापना करत उमेदवार उभे केले. मात्र त्यात त्यांना अपयश आलं आणि भाजपानं स्पष्ट बहुमत मिळवलं. यानंतर गोटे पक्षापासून आणखी दूर गेले.