शुक्रवार, 26 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. लोकसभा निवडणूक 2019
  3. लोकसभा निवडणूक 2019 बातम्या
Written By
Last Modified: गुरूवार, 2 मे 2019 (09:45 IST)

तेजबहादूर यादव यांची उमेदवारी रद्द

वाराणसी लोकसभा मतदारसंघातून पंतप्रधान नरेंद्र मोदींविरोधात समाजवादी पक्षाच्या तिकिटावर निवडणूक लढवणारे तेजबहादूर यादव यांची उमेदवारी रद्द करण्यात आली आहे. लष्कराने केलेल्या निलंबनाच्या कारवाईबाबत प्रतिज्ञापत्रांमध्ये योग्य कारण न देऊ शकल्याने तेजबहादूर यांची उमेदवारी रद्द करण्यात आली आहे. निवडणूक आयोगाच्या या निर्णयविरोधात सर्वोच्च न्यायालयात जाणार असल्याचे तेजबहादूर यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले. 
 
आधी अपक्ष म्हणून लढणाऱ्या तेजबहादूर यांना समाजवादी पक्षाने तिकीट दिले. उमेदवारी अर्ज दाखल करताना तेजबहादूर यांनी 2 प्रतिज्ञापत्र सादर केली होती. 24 एप्रिल रोजी अपक्ष म्हणून अर्ज दाखल करत असताना यादव यांनी भ्रष्टाराचाच्या आरोपांमुळे आपल्याला सैन्यातून निलंबित केल्याचं म्हटलं होतं. समाजवादी पक्षाकडून उमेदवारी मिळाल्यानंतर यादव यांनी 29 एप्रिल रोजी नव्याने प्रतिज्ञापत्र सादर केलं होतं. दुसऱ्या प्रतिज्ञापत्रात त्यांनी निलंबनाबाबतची माहिती लपवल्याचा आरोप केला गेला आहे.