रविवार, 29 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. लोकसभा निवडणूक 2019
  3. लोकसभा निवडणूक 2019 बातम्या
Written By

लोकसभेच्या मतदानादिवशी जेथे मतदान तेथे सुट्टी, या आहेत तारखा

लोकसभा निवडणुकीत मतदान करता यावे याकरिता राज्य शासनाने मतदानाच्या दिवशी सार्वजनिक सुट्टी जाहीर केली असून, सुट्टी कामासाठी आपल्या लोकसभा मतदार संघाच्या क्षेत्राबाहेर असतील अशा कर्मचाऱ्यांना लागू असणार आहे. यामध्ये  राज्य आणि केंद्र शासनाची कार्यालये, निमशासकीय कार्यालये, सार्वजनिक उपक्रम तसेच अकृषी, कृषी आणि अन्य विद्यापीठे, अभिमत विद्यापीठे, शिक्षण संस्था इतर विभागकरीता ही सुट्टी लागू राहणार आहे.
 
पहिल्या टप्प्यात 11 एप्रिल 2019 रोजी वर्धा, रामटेक, नागपूर, भंडारा- गोंदिया, गडचिरोली-चिमूर, चंद्रपूर आणि यवतमाळ- वाशिम लोकसभा मतदारसंघासाठी मतदान होणार असून त्यादिवशी संबंधित मतदार संघात सार्वजनिक सुट्टी राहील. 
 
दुसरा टप्पा बुलढाणा, अकोला, अमरावती, हिंगोली, नांदेड, परभणी, बीड, उस्मानाबाद, लातूर आणि सोलापूर  दहा मतदारसंघांसाठी 18 एप्रिल 2019 रोजी मतदानाच्या दिवशी सुट्टी राहील.
 
तिसऱ्या टप्पयातील जळगाव, रावेर, जालना, औरंगाबाद, रायगड, पुणे, बारामती, अहमदनगर, माढा, सांगली, सातारा, रत्नागिरी-सिंधुदुर्ग, कोल्हापूर आणि हातकणंगले अशा 14 मतदारसंघात 23 एप्रिल रोजी मदतानाच्या दिवशी सुट्टी राहील. 
 
चौथ्या आणि अखेरच्या टप्प्यातील नंदुरबार, धुळे, दिंडोरी, नाशिक, पालघर, भिवंडी, कल्याण, ठाणे, मुंबई उत्तर पश्चिम, मुंबई उत्तर पूर्व, मुंबई उत्तर मध्य, मुंबई दक्षिण मध्य, मुंबई दक्षिण, मावळ, शिरुर आणि शिर्डी या 17 मतदारसंघात 29 एप्रिलला सार्वजनिक सुट्टी राहील.