1. मराठी बातम्या
  2. लोकसभा निवडणूक 2019
  3. लोकसभा निवडणूक 2019 बातम्या
Written By

महाआघाडीचे जागावाटप जाहीर

loksabha election 2019
महाआघाडीच्या लोकसभेच्या जागांसाठीची घोषणा करण्यात आली आहे. काँग्रेस २४ जागांवर तर राष्ट्रवादी २० जागांवर लोकसभा निवडणूक लढवणार आहे. बहुजन विकास आघाडीला १ जागा, स्वाभिमानीला २ जागा तर युवा स्वाभिमानी पक्षाला १ जागा देण्यात आली आहे.

महाआघाडीच्या जागावाटपावर यामुळे आता शिक्कामोर्तब झालं आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी पत्रकार परिषद घेऊन ही घोषणा केली. या पत्रकार परिषदेला .राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह अशोक चव्हाण यांनी ही पत्रकार परिषद घेतली ज्यामध्ये महाआघाडीचं जागावाटप जाहीर करण्यात आलं.