शनिवार, 28 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. लोकसभा निवडणूक 2019
  3. लोकसभा निवडणूक 2019 बातम्या
Written By
Last Modified: मंगळवार, 16 एप्रिल 2019 (09:11 IST)

मराठवाड्याचा कॅलिफोर्निया करणार - नितीन गडकरी

कायमच दुष्काळ असलेल्या मराठवाड्याला केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी मोठं आश्वासन दिल आहे. मराठवाड्याला कॅलिफोर्निया करण्याचा निश्चय नितीन गडकरींनी केला आहे. भाजपाला जर जनतेने मतदान केले तर मराठवाड्याचा कॅलिफोर्निया करण्याचं आश्वासन नितीन गडकरींनी लातूरच्या प्रचारसभेत बोलताना मतदारांना दिले आहे. लातूरमध्ये भाजपाची प्रचार सभा होती. या सभेत बोलताना नितीन गडकरींनी नदी जोड प्रकल्प योजनेवर आपले मत व्यक्त केले. जर भाजपला मतदान केले तर दुष्काळी मराठवाड्याचा कॅलिफोर्निया करू असं आश्वासनच त्यांनी दिले आहे. गडकरी म्हणाले की, आपण जे बोलतो ते करतोच, हे सांगायला ते यावेळी विसरले नाहीत. राज्याच्या बाहेरच्या नद्यांचं पाणी देखील मराठवाड्यात आणण्याचं आश्वासन गडकरींनी दिल आहे. गडकरी हे भाजपाचे मोठे नेते असून ते प्रधानमंत्री व्हावेत असे अनेकदा बोलेले गेले आहे, त्यामुळे गडकरी यांच्या आश्वासनाला महत्व प्राप्त होते आहे.