शनिवार, 25 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. लोकसभा निवडणूक 2019
  3. लोकसभा निवडणूक 2019 बातम्या
Written By
Last Modified: गुरूवार, 25 एप्रिल 2019 (09:45 IST)

मोदींनी शेतकऱ्यांची सवांद साधायला हवा

मोदी यांनी अभिनेत्याशी नव्हे, तर शेतकऱ्यांची सवांद साधायला हवा असे परखड मत काँग्रेसच्या पूर्व उत्तर प्रदेश सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी व्यक्त केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिनेता अक्षय कुमार यांच्याशी दिलखुलास गप्पा मारल्या. मोदींच्या दिलखुलास बातचितवर विरोधकांनी टीकेची झोड उठवली आहे.
 
प्रियांका गांधी सध्या उत्तर प्रदेश मधील महोब दौऱ्यावर आहेत. यावेळी त्या म्हणाल्या, तुम्ही पाहिले असेल मोदी मोठ मोठ्या अभिनेत्यांची संवाद साधत आहेत. कधी तुम्ही त्यांना जनतेमध्ये पाहिले आहे का? वाराणसीमध्ये दौऱ्यावर गेले होते. गेले पाच वर्ष पंतप्रधान मोदी कोणत्याही गावात आले नसल्याची माहिती समोर आली. खरतर मोदींनी अभिनेत्यांशी नव्हे, तर शेतकऱ्यांची सवांद साधने गरजेचे आहे. पक्षाची इच्छा असल्यास वाराणसीतून लढणार असल्याचे प्रियांका यांनी सांगितले.