सोमवार, 30 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. लोकसभा निवडणूक 2019
  3. लोकसभा निवडणूक 2019 बातम्या
Written By
Last Modified: मंगळवार, 9 एप्रिल 2019 (16:40 IST)

प्रकाश राज राजू शेट्टी यांच्यासाठी प्रचार सभा घेणार

सिंघम चित्रपटांमध्ये जयकांत शिक्रे या खलनायकाची भूमिका करणारे प्रकाश राज हे राजू शेट्टी यांच्यासाठी प्रचार सभा घेणार आहेत. कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले लोकसभा मतदारसंघात १९ किंवा २० तारखेला प्रकाश राज यांची सभा होऊ शकते. राजू शेट्टी यांनी काढलेली किसान संघर्ष यात्रा तसंच शेट्टी यांच्या वाटचालीमुळे प्रकाश राज प्रभावित झाले आहेत. त्यामुळे त्यांनी राजू शेट्टी यांच्या प्रचाराला येण्याचं मान्य केलं आहे.
 
२०१४ मध्ये भाजपसोबत असलेले राजू शेट्टी एनडीए सरकारमधून बाहेर पडले. राज्यातही त्यांनी महायुतीमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. राजू शेट्टी यांना काँग्रेस आणि राष्ट्रवादीने पाठिंबा दिला आहे. हातकणंगले मतदारसंघातून स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या तिकीटावर खासदार राजू शेट्टी पुन्हा एकदा निवडणुकीच्या रिंगणात आहेत. त्यांचं कुटुंबिय देखील प्रचारात सक्रीय दिसत आहेत.