शनिवार, 25 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. लोकसभा निवडणूक 2019
  3. लोकसभा निवडणूक 2019 बातम्या
Written By
Last Modified: बुधवार, 10 एप्रिल 2019 (18:09 IST)

संजय निरूपमला कोणत्याही प्रकारे मदत नाही :मनसे

महाराष्ट्र विरोधात भूमिका घेणाऱ्या संजय निरूपमला आगामी लोकसभा निवडणुकीत मनसे कोणत्याही प्रकारे मदत करणार नाही, अशी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची ठाम भूमिका आहे असं मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी स्पष्ट केलं आहे. मागील काही दिवसांपासून संजय निरुपमचा प्रचार मनसे करणार का? या प्रश्नाला मनसेकडून उत्तर देण्यात आलं आहे. 
 
संजय निरुपम आणि मनसे यांच्यात उत्तर भारतीयांच्या मुद्द्यांवरुन अनेकदा वाद निर्माण झाले आहेत. इतकचं नव्हे तर संजय निरुपम मुंबई अध्यक्ष असताना राज ठाकरेंच्या विरोधात केलेल्या वक्तव्यामुळे मनसेचे कार्यकर्ते आक्रमक झाले होते. यातूनच संजय निरुपम यांचे कार्यालय मनसेच्या कार्यकर्त्यांकडून फोडण्यात आलं होतं.