बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. लोकसभा निवडणूक 2019
  3. लोकसभा निवडणूक 2019 बातम्या
Written By
Last Updated : सोमवार, 11 मार्च 2019 (10:34 IST)

मुख्यमंत्र्यांची शिफारस मनसेच्या एकमेव आमदाराला शिवसेनेत घ्या

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे फक्त एक आमदार शरद सोनवणे शिवसेनेत आज अधिकृत प्रवेश करणार आहेत. तर सोनवणे यांना शिवसेनेत प्रवेश दिला जावा याकरिता स्वतः राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे शिफारस केल्याची धक्कादायक माहिती समोर आली असू, ही माहिती स्वत: आमदार शरद सोनवणे यांनी दिली. शरद सोनवणे हे चांगले काम करणारे आमदार असून, त्यांचे काम चांगल्या पद्धतीने पार पाडत आहेत, तर शिवसेनेकडून त्यांना निवडणूक लढण्याची इच्छा आहे, असा शब्द मुख्यमंत्र्यांनी उद्धव ठाकरेंसमोर टाकल्याचं सोनवणे म्हणाले आहेत. उद्धव ठाकरे यांनी सोनवणे यांना शब्द दिला असून सोमवारी 11 मार्चला दुपारी दोन वाजता ते शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. अशी माहिती सोनवणे यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे. त्यामुळे मनसे प्रमुख येत्या काळात आपली नेमकी काय भूमिका घेतात हे पाहणे गरजेचे ठरणार आहे.