मंगळवार, 30 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. लोकसभा निवडणूक 2019
  3. लोकसभा निवडणूक 2019 बातम्या
Written By
Last Modified: गुरूवार, 11 एप्रिल 2019 (09:46 IST)

मतदान करणार आहात मग ही आहेत निवडणूक आयोगाने ग्राह्य केलेल्या ओळखपत्रांची यादी

सध्या देशात लोकसभा मतदान सुरु झाले आहे. पहिल्या टप्प्यातील मतदान होत आहे. मात्र मतदान करतांना बोगस वोटिंग होवू नये म्हणून खबदारी घेण्यात येते. योग्य मतदान कार्ड नसेल तर योग्य असे ओळखपत्र पाहिले जाते अथवा तुम्ही मतदान करू शकत नाही. त्यामुळे  मतदानासाठी भारत निवडणूक आयोगाचे ओळखपत्र नसेल आणि मतदार यादीत नाव असेल तर अशा वेळी अन्य अकरा प्रकारे आयोगाने ग्राह्य केलेल्या ओळखपत्रांच्या माध्यमातून मतदारास आपला हक्क बजावता येईल.
 
मतदान ओळखपत्र नसेल तर हे ओळखपत्र तुम्ही वापरू शकता : 
 
पासपोर्ट (पारपत्र),
वाहन चालक परवाना,
छायाचित्र असलेले कर्मचारी ओळखपत्र (राज्य/केंद्र शासन, सार्वजनिक उपक्रम, सार्वजनिक मर्यादित कंपन्यांचे ओळखपत्र),
छायाचित्र असलेले बँकांचे पासबूक,
पॅनकार्ड,
राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणी (नॅशनल पॉप्युलेशन रजिस्टर)
अंतर्गत महसूल निर्मिती निर्देशांक (रेव्हेन्यू जनरेशन इंडेक्स) द्वारे दिलेले स्मार्टकार्ड,
मनरेगा कार्यपत्रिका,
कामगार मंत्रालयाने दिलेले आरोग्य विमा स्मार्टकार्ड,
छायाचित्र असलेले निवृत्तीवेतन दस्तावेज,
खासदार/आमदार/विधानपरिषद सदस्य यांना दिलेले ओळखपत्र
आधारकार्ड यांचा समावेश आहे.