धर्माचा विजय, अधर्माचा नाश – साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर
यंदाच्या लोकसभा निवडणुकांमध्ये सर्वाधिक चर्चेत राहिलेल्या उमेदवारांपैकी एक असलेल्या भाजपच्या साध्वी प्रज्ञा सिंह हिने भोपाळ लोकसभा मतदारसंघातून आघाडी घेतल्याचे चित्र आहे. या पार्श्वभूमीवर माझ्या विजयात धर्माचा विजय आहे. आणि अधर्माचा नाश होणार आहे, अशी पतिक्रिया साध्वी प्रज्ञा सिंह यांनी दिली आहे. तसेच भोपाळमधील जनतेचे आभारही त्यांनी मानले.
साध्वी प्रज्ञा यांना २, २५, १८३ मते आणि काँग्रेस उमेदवार दिग्विजय सिंह यांना १ लाख ६८ हजार ५८९ मते मिळाली आहेत.