मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. लोकसभा निवडणूक 2019
  3. लोकसभा निवडणूक निकाल 2019
Written By
Last Modified: गुरूवार, 23 मे 2019 (12:15 IST)

आएगा तो................ :):):)

लोकसभा निवडणूक निकालाची आतुरतेने वाट बघत असणार्‍यांचे सर्व लक्ष आज मतमोजणीवर आहे. देशभारातून येणारे निकालाचे कल बघता पंतप्रधान मोदी पुन्हा एकदा सत्तेवर येणार असा विश्वास पक्षाला आणि जनतेला होत आहे. यावर भाजप समर्थक अभिनेते अनुपम खेरने आपल्या भावना ट्विट केल्या आहेत.
 
या निवडणुकीत काही बॉलिवूड कलाकार उमेदवार म्हणून उभे होते तर अनेक या निवडणुकीत वेगवेगळ्या उमेदवारांनी पाठिंबा देत होते. अगदी उघडपणे पाठिंबा देत ते विरोधी पक्षांच्या समर्थकांशी वाद घालताना देखील दिसले. 
 
मनोरंजनाच्या दुनियेतील अनेक कलाकारांनी पुन्हा मोदींना पंतप्रधान बनवण्याचे आवाहनही केले. आता मोदींची सरकार येत असल्याचे दिसत असताना आएगा तो................ :):):) असे अनुपम खेर यांनी ट्विट केले आहे.