शुक्रवार, 24 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Updated : मंगळवार, 24 डिसेंबर 2024 (20:49 IST)

पालघरमध्ये वनविभागाच्या अधिकाऱ्यावर लाच मागितल्याचा आरोप,गुन्हा दाखल

maharashtra
Maharashtra Marathi Breaking News Live Today: 20 लाख रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी महाराष्ट्रातील पालघरमध्ये वन विभागाच्या अधिकाऱ्यासह अन्य दोघांविरुद्ध एफआयआर नोंदवण्यात आला आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या म्हणण्यानुसार, एका गावकऱ्याने तक्रार केली होती की वनक्षेत्रात असलेली त्याची जमीन परत मिळवण्यासाठी त्याला मदत करण्यासाठी लाच मागितली जात होती.राज्यात घडत असलेल्या सर्व घडामोडींवर आम्ही लक्ष ठेवून आहोत. तर बघू आज दिवसभरात काय घडतं ते....   

08:48 PM, 24th Dec
राहुल गांधी यांच्या परभणी दौऱ्यावर भाजप नेते प्रवीण दरेकर यांचा काँग्रेसवर हल्लाबोल
महाराष्ट्रातील परभणी येथील हिंसाचारावरून पुन्हा एकदा राजकारणाचा टप्पा सुरू झाला आहे. सोमवारी लोकसभेतील विरोधी पक्षनेते आणि काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी परभणीला भेट दिली. यावर भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी राहुल गांधी आणि काँग्रेसवर जोरदार हल्ला चढवला आहे.सविस्तर वाचा..... 

08:19 PM, 24th Dec
पालघरमध्ये वनविभागाच्या अधिकाऱ्यावर लाच मागितल्याचा आरोप,गुन्हा दाखल
20 लाख रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी महाराष्ट्रातील पालघरमध्ये वन विभागाच्या अधिकाऱ्यासह अन्य दोघांविरुद्ध एफआयआर नोंदवण्यात आला आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या म्हणण्यानुसार, एका गावकऱ्याने तक्रार केली होती की वनक्षेत्रात असलेली त्याची जमीन परत मिळवण्यासाठी त्याला मदत करण्यासाठी लाच मागितली जात होती.

06:45 PM, 24th Dec
महाराष्ट्रातील बदलापूरमध्ये ब्रेडच्या दरात वाढ, 3 रुपयांनी वाढ
महाराष्ट्रातील ठाणे जिल्ह्यातील बदलापूर येथील बेकरी मालकांच्या संघटनेने मंगळवारपासून ब्रेडच्या (डबल रोटी) किमतीत 3 रुपयांनी वाढ केली आहे. त्याची किंमत आता 20 रुपयांवरून 23 रुपये झाली आहे.

05:07 PM, 24th Dec
दाऊद इब्राहिमच्या भावावर मोठी कारवाई, ईडीने मुंबईतील फ्लॅट ताब्यात घेतला
फरारी गुंड दाऊद इब्राहिमचा भाऊ इकबाल कासकरच्या विरुद्ध ईडीने मनी लॉन्डरिंगच्या तपासाच्या अंतर्गत मोठी कारवाई केली आहे. दाऊद इब्राहिमच्या भावाच्या कथित साथीदाराच्या नावावर महाराष्ट्रातील ठाणे येथे 55 लाख रुपयांचा फ्लॅट ताब्यात घेण्यात आला आहे. सविस्तर वाचा..

04:36 PM, 24th Dec
मुंबई बोट दुर्घटनेत प्राण वाचवणाऱ्या आरिफ बामणे यांचा उद्धव ठाकरें कडून गौरव
मुंबई किनारपट्टीवर नीलकमल या नौदलाच्या स्पीडबोटला अपघात होऊन 13 जणांचा दुर्देवी मृत्यू झाला. अनेकांना वाचवण्यात यश मिळाले.अनेकांचा जीव वाचवणाऱ्या आरिफ बामणे यांचा शिवसेना यूबीटीचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी गौरव केला. सविस्तर वाचा...
 

04:09 PM, 24th Dec
पालघरमधील खून आणि दरोड्यातील आरोपीला 21 वर्षांनंतर जालनातून अटक
ठाण्याच्या पालघर मध्ये 21 वर्षांपूर्वीच्या दरोड्यातील एका प्रकरणातील फरार आरोपीला पोलिसांनी जालना जिल्ह्यातून अटक केली आहे. पोलिसांनी ही माहिती दिली. सविस्तर वाचा...
 

02:59 PM, 24th Dec
एकनाथ शिंदेच्या मंत्र्यांना भाजपने फसवले! शिवसेना संतप्त
महाराष्ट्रात नुकताच मंत्रिमंडळाचा विस्तार झाला.तसेच राज्यातील विभागाचे वाटप देखील अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी झाले. या नंतर काही नेते मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्याने नाराज होते. मात्र आता केबिनेटचे काही मंत्री नाराज सल्याचा बातम्या समोर येत आहे. 

01:28 PM, 24th Dec
पत्नीची हत्या करून फरार असलेल्या पतीला 33 वर्षांनंतर मुंबई पोलिसांनी पकडले
पत्नीची हत्या करून अनेक वर्षे कायद्याच्या नजरेतून सुटलेल्या एका व्यक्तीला तब्बल 33 वर्षानंतर अटक केल्याची धक्कादायक बातमी नवी मुंबईतून समोर आली आहे. तसेच पत्नीच्या हत्येच्या आरोपाखाली 33 वर्षांपासून फरार असलेल्या या व्यक्तीला नवी मुंबई पोलिसांनी अटक केल्याची माहिती एका अधिकाऱ्याने मंगळवारी दिली. सविस्तर वाचा 

01:15 PM, 24th Dec
देवेंद्र फडणवीस सभागृहात खोटे बोलले! राहुल गांधींच्या समर्थनार्थ संजय राऊत म्हणाले
शिवसेनेचे यूबीटी खासदार संजय राऊत यांनी मंगळवारी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या महाराष्ट्रातील परभणी दौऱ्याचा बचाव करताना म्हटले की, गंभीर घटना घडलेल्या कोणत्याही ठिकाणी भेट देण्याचा राहुल गांधींना घटनात्मक अधिकार आहे. सविस्तर वाचा 

11:35 AM, 24th Dec
भाजप नेते किरीट सोमय्या यांनी राहुल गांधींच्या वादग्रस्त वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली
सोमवारी राहुल गांधी यांनी परभणीला भेट दिली, जिथे त्यांनी परभणी हिंसाचारात शहीद झालेल्या सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली. सविस्तर वाचा 

11:12 AM, 24th Dec
शिवसेनेचे यूबीटी नेते सुभाष देसाई मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांची भेट घेतली
शिवसेना यूबीटी नेत्याने मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांची भेट घेतली शिवसेना यूबीटी नेत्यांनी सोमवारी महाराष्ट्राच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांची भेट घेतली होती. यावेळी नेत्यांनी मतदार यादीत समाविष्ट असलेल्या बनावट नावांबाबत निवेदनही दिले. सविस्तर वाचा 

10:45 AM, 24th Dec
वंदे भारत ट्रेन पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आहे. यावेळी गाडीचा रस्ता चुकला. या संदर्भात उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि समाजवादी पक्षाचे सुप्रीमो अखिलेश यादव यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे.

09:55 AM, 24th Dec
चंद्रशेखर बावनकुळे काँग्रेसवर निशाणा साधत म्हणाले राहुल गांधी परभणीत नाटक करायला आले होते
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी हिंसाचारग्रस्त परभणीला भेट दिल्यानंतर, महाराष्ट्राचे मंत्री आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सोमवारी सांगितले की राहुल गांधी "नाटक आणि समाज भडकावण्यासाठी" परभणीत आले होते. सविस्तर वाचा  

09:54 AM, 24th Dec
मुंबईतील मानखुर्द येथे एका गोदामाला भीषण आग
मुंबईतील मानखुर्द-घाटकोपर लिंक रोडवर भीषण आग लागली. ही आग एका भंगाराच्या गोदामात लागली. सविस्तर वाचा 
 

09:53 AM, 24th Dec
या महिलांना मिळणार नाही 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने'चा लाभ! सरकारच्या नवीन अटी जाणून घ्या
महिला सक्षमीकरणाला चालना देण्यासाठी महाराष्ट्र सरकारने ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ सुरू केली. या महिला सन्मान योजना ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ अंतर्गत, महाराष्ट्र सरकार दरमहा 1500 रुपये महाराष्ट्रातील महिलांच्या खात्यावर पाठवते. ही रक्कम थेट लाभ हस्तांतरण म्हणजेच DBT अंतर्गत महिलांच्या खात्यात पाठवली जाते. सविस्तर वाचा 
 

09:53 AM, 24th Dec
पनवेलला जायचं होतं पण कल्याणला पोहचली, हायटेक वंदे भारत ट्रेन कशी रस्ता चुकली? रेल्वेने दिले कारण
सध्या सोशल मीडियावर गोवा वंदे भारत ट्रेनची चर्चा आहे. तसेच गोव्याला जाणारी वंदे भारत ट्रेन कल्याणमध्ये पोहोचल्याचे बोलले जात आहे. आता स्वत: रेल्वे अधिकाऱ्यांनी पुढे येऊन याप्रकरणी खुलासा केला आहे. तांत्रिक बिघाडामुळे गाडीचा मार्ग बदलण्यात आला असून मार्ग वळवावा लागल्याची चर्चा आहे. सविस्तर वाचा