मंगळवार, 18 मार्च 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. लोकप्रिय
Written By
Last Modified: गुरूवार, 17 सप्टेंबर 2020 (09:06 IST)

मोदींच्या वाढदिवसाला #राष्ट्रीय_बेरोजगारी_दिवस, #NationalUnemploymentDay हॅशटेग ट्विटरवर टॉप

आज देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस असून ते 70 वर्षांचे झाले आहेत. भाजप त्यांचा वाढदिवस सेवा सप्ताह या रुपात साजरा करत असली तरी काँग्रेसने हा दिवस बेरोजगार दिनाच्या रुपात साजरा करण्याची घोषणा केली आहे. 
 
सकाळपासून ट्विटरवर #राष्ट्रीय_बेरोजगारी_दिवस, #NationalUnemploymentDay हॅशटेग टॉप ट्रेडिंगवर असून यूजर्स पीएम मोदींना विचारत आहे की रोजगार कुठे आहे?
 
पंतप्रधान मोदी यांचा वाढदिवसाला काँग्रेसने राष्ट्रीय बेरोजगारी दिवस नाव दिले असून एनएसयूआय बेरोजगारी या मुद्द्यावरुन भजी विकून विरोध प्रदर्शन करणार आहे.