रविवार, 28 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. लोकप्रिय
Written By
Last Modified: सोमवार, 30 जुलै 2018 (09:08 IST)

बाप्परे, रेल्वेने 2014 पाठवलेले खत 2018 साली पोहोचवले

भारतीय रेल्वेने 2014 साली पाठवलेले खत संबंधित स्थळी 2018 साली पोहोचवले आहे. आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणम येथून मालगाडीतून उत्तरप्रदेशातील बस्ती जिल्ह्यात पोहोचवण्यासाठी खत पाठवले गेले. 2014 मध्ये ही मालगाडी तेथून निघाली. तिला 1400 किमी अंतर पार करुन बस्ती येथे जायचे होते. या खताची किंमत 10 लाख इतकी होती. बस्ती येथे खताची डिलिव्हरी झाली नसल्याचे लक्षात येताच भारतीय रेल्वेशी संपर्क करण्यात आला. मात्र रेल्वेला हे डबे शोधता आले नाहीत. हे डबे भारतभर एका स्टेशनमागे दुसऱ्य़ा स्टेशनमध्ये फिरत राहिले आणि शेवटी 3.5 वर्षांनी बस्ती येथे पोहोचले आहेत. यामधील सर्व खत खराब झाले असून त्याचे मालक रामचंद्र गुप्ता यांनी ते स्विकारण्यास नकार दिला आहे. आपण गेली साडेतीन वर्षे रेल्वेक़डे चौकशी केली मात्र रेल्वेने कोणतेही उत्तर दिले नाही. आता हे खत खराब झाले असून त्याची भरपाई रेल्वेने द्यावी अशी मागणी गुप्ता यांनी केली आहे.