शनिवार, 28 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. लोकप्रिय
Written By
Last Modified: शनिवार, 22 सप्टेंबर 2018 (15:23 IST)

कोळ्यांनी विणलं 310 मीटर लांबीचं जाळं

घरात आणि रानावनात तुम्ही कोळ्याचं जाळं पाहिलं असेल. हे जाळं असं किती मोठं असू शकतं? 6 इंच, 1 फूट, 2 फूट. यापेक्षा जास्त नक्कीच नाही. पण तुम्हाला आश्चर्य वाटेल, ग्रीसमध्ये समुद्र किनार्‍यावर तब्बल 310 फूट लांबीचं कोळ्यांचं जाळं दिसून आलं आहे. पश्चिम ग्रीसमध्ये उबदार हवामानामुळे हे जाळं विणलं आहे. ग्रीसमधील ऐटोलिकोमध्ये सुद्रकिनारी हिरवळीवर हे भलं मोठं जाळं पसरलं आहे. तज्ज्ञांचं मत आहे की घटना ठरावीक काळात दिसणारी आहे. टेट्रागांथा प्रजातीचे कोळी असं मोठं जाळं निर्माण करू शकतात. 
 
इथं डासांची संख्या वाढली असल्याने तेही यामागचं एक कारण असावं असं तज्ज्ञांना वाटतं. इथल्या डोमेर्टिकस विद्यापीठातील प्रा. मारिया चाट्‌जकी म्हणाल्या, ग्रीसमधील तापमान जास्त आहे. शिवाय आर्द्रताही आहे. शिवाय अन्नही उपलब्ध असल्याने या कोळ्यांनी हे जाळं विणलं आहे. खरंतर कोळ्यांसाठी ही पार्टीच आहे. त्यांनाभरपूर अन्न आहे, त्यांना जोडीदारही मिळाले आहेत. या कोळ्यांचा माणसांना आणि तिथल्या वनस्पतींना कोणताही धोका नाही.