शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. लोकप्रिय
Written By

अंतर्गत कलहाला कंटाळून नागरिक सोडत आहेत आपला देश

अमेरिकेमध्ये कायमचा निवारा मिळविण्यासाठी तब्बल ७००० भारतीय नागरिकांनी अअर्ज केल्याचे वास्तव समोर आले आहे. संयुक्त राष्ट्रसंघाच्या निर्वासित एजन्सी (रिफ्युजी एजन्सी) च्या ताज्या अहवालामधून जगाच्या पाठीवरील निर्वासितांच्या सद्यस्थितीचा हे चित्र स्पष्ट झाले आहे. सन २०१७ च्या अखेरपर्यत तब्बल ६.८ कोटी लोक जगभरातून आपली मायभूमी सोडून इतर देशात स्थाईक झाले आहेत. स्वतःच्या देशातील जातीवाद, हिंसाचार, बेरोजगारी, अंतर्गत यादवी, गरिबी, युद्धजन्य परिस्थिती आदी विविध कारणांमुळे विस्थापित लोकांची यादी वाढतच आहे. मागच्या  वर्षी जवळपास दीड कोटी लोकांनी आपला जन्मदेश सोडला आहे. 
 
भारतामधून अमेरिकडेकडे निवारा मागणाऱ्या लोकांची संख्या २०१७ च्या अखेरपर्यंत ४०,३९१ वर आहे. तर दुसरीकडे भारतामध्ये शरणार्थी लोकांची संख्या १,९७,१४६ व निवारा मागणाऱ्या लोकांचा आकडा १०,५१९ वर आहे. अंतर्गत यादवीमुळे भीषण परिस्थितीला सामोरे जात असलेल्या अफगाणिस्तानमधून सर्वांधिक १,२४,९०० लोकांनी जगभरामधील ८० देशांकडे आसऱ्यांची मागणी करत आहेत. आर्थिक आघाड्यांवरील आव्हानात्मक परिस्थितीमुळे अडचणीत सापडलेल्या व्हेनेझुएलामधील २९,९०० लोकांनी अमेरिकेकडे आसऱ्यासाठी मागणी केली आहे. म्यानमारमधून रोहिंग्यांना परांगदा होण्याची वेळ आल्याने बांगलादेशने त्यांना सहारा दिला. ही संख्या ९,३२,२०० इतकी आहे.