रविवार, 28 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By

कर्जमाफीच्या ऑनलाईन अर्ज नोंदणीची मुदत 20 मे पर्यंत

राज्यातील शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या कर्जमाफीची ऑनलाईन अर्ज नोंदणीची मुदत वाढवून 20 मे पर्यंत करण्यात आली आहे. 
 
मागील वर्षी जून महिन्यात ‘छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना’ जाहीर केली गेली होती परंतू प्रक्रिया ऑनलाइन असल्यामुळे गोंधळ उडाला होता. तांत्रिक कारणांमुळे हजारो शेतकऱ्यांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज सादर करता आले नाहीत. निश्चित आकडेवारीही उपलब्ध नव्हती आणि या सगळ्यांमुळे सरकारला टीकेलाही सामोरे जावे लागले होते. ऑनलाइन अर्ज करणे ग्रामीण भागातील शेतकर्‍यांसाठी सोपे नव्हते.
 
हे सर्व लक्षात घेता आतापर्यंत चार ते पाच वेळा मुदतवाढ देण्यात आली आहे. शेवटची मुदत १४ एप्रिल होती, ती वाढवून १ मे करण्यात आली होती. आता पुन्हा एकदा ही मुदत 20 मे पर्यंत वाढवण्यात आली आहे.