रविवार, 26 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. लोकप्रिय
Written By
Last Modified: शुक्रवार, 9 डिसेंबर 2022 (23:30 IST)

कोब्रासोबत खेळणारा चिमुकला

फक्त सापांच नाव जरी घेतलं तरी लोकांना घाम फुटतो आणि त्यात किंग कोब्रा असेल तर नाव ऐकताच लोक घाबरून पळू लागतात.  पण एकीकडे जिथे भीती असते, तर दुसरीकडे लोकांना त्यांच्याबद्दल खूप काही जाणून घ्यायलाही आवडते.
 
सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एक लहान मुलगा एका धोकादायक कोब्रासोबत अतिशय आरामात खेळत असल्याचे दिसून येत आहे, ते मूल त्याला अनेक वेळा स्पर्श करते आणि या धोकादायक सापाला पकडण्याचा प्रयत्नही करते.  हा व्हिडीओ पाहून लोकांचा थरकाप उडाला आहे. 
 
व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये एक छोटा मुलगा जमिनीवर बसलेला दिसत आहे.  एक किंग कोब्रा त्याच्या जवळ रेंगाळताना दिसतो. तो चिमुकला त्याला वारंवार हात लावताना दिसत आहे.
 
किंग कोब्रा आपला फणा काढत आहे आणि जेव्हा मुल आपला हात हलवते तेव्हा तो फणा हलवते.  यानंतर, मुल अनेक वेळा कोब्राचे फणा पकडण्याचा प्रयत्न करत असते, परंतु ते घसरते आणि थोडे दूर जाते.  हे पाहून दोघेही एकमेकांशी खेळत असल्याचे दिसते.संपूर्ण व्हिडिओमध्ये मूल किंग कोब्राला घाबरलेले कुठेही दिसत नाही. मुलानेही त्याला दोन्ही हातांनी अगदी आरामात पकडले.  पण किंग कोब्रा मुलाच्या तोंडाजवळ जातो आणि पुन्हा मागे जातो.हे पाहून चिमुकला आनंदी होतो. 
 
युजर्स या व्हिडीओ वर आपली प्रतिक्रिया देत आहे. 

Edited By- Priya Dixit