गुरूवार, 25 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. लोकप्रिय
Written By
Last Modified: पुणे , गुरूवार, 10 मे 2018 (08:54 IST)

आधी आधार काढा मग दहावी, बारावीचा निकाल पाहा

यंदापासून राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून इयत्ता दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी आधार कार्ड अनिवार्य करण्यात आले होते. मात्र, अद्याप दहावी, बारावीच्या प्रत्येकी वीस टक्‍के विद्यार्थ्यांकडून आधार काढण्यात आलेले नाही. परीक्षेदरम्यान ज्या विद्यार्थ्यांनी आधार काढले नाही अशांनी निकालापर्यंत काढण्याचे हमीपत्र मंडळाला सादर केले आहे. त्यामुळे निकालाच्या वेळी विद्यार्थ्यांना आधार कार्ड काढणे गरजेचे झाले आहे.
 
राज्य शासनाकडून इयत्ता पहिली ते बारावीच्या विद्यार्थ्यांची माहिती सरल या संगणक प्रणालीमध्ये भरण्यात येत आहे. ही माहिती आधारशी लिंक करण्यात येत आहे. तसेच दहावी बारावीनंतर विद्यार्थ्यांची लिंक राहावी, शालाबाह्यांचा शोध घेता यावा, अकरावी प्रवेशाचा डेटा लिंक करता यावा आदी गोष्टींसाठी शासनाकडून आधार कार्ड अनिवार्य करण्यात आले आहे.