testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2

आमच्या पक्षात गटबाजी नाही - जयंत पाटील

Jayant Patil
Last Modified बुधवार, 9 मे 2018 (16:42 IST)

- प्रदेशाध्यक्षांच्या फेसबुक लाईव्हला भरभरून प्रतिसाद

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात कोणत्याही प्रकारची गटबाजी नाही, राज्याच्या विकासासाठी आम्ही एकजुटीने काम करू असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी व्यक्त केला. पक्षाच्या मुंबई येथील प्रदेश कार्यालयात आज जयंत पाटील

यांनी फेसबुकद्वारे कार्यकर्त्यांशी संवाद साधला. प्रदेशाध्यक्षपदी निवड झाल्यानंतर ते पहिल्यांदाच फेसबुक लाईव्हद्वारे संवाद साधत होते. या फेसबुक लाईव्हला कार्यकर्त्यांनी भरभरून प्रतिसाद दिला.

येत्या काळात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी बुथ लेवलवर जास्त भर देणार असून पक्षाच्या संघटनेत तरुणांना संधी देण्यास आम्ही प्राधान्य देऊ, येणाऱ्या लोकसभा तसेच विधानसभा निवडणुकांसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मेहनत घेईल असे आश्वासन पाटील यांनी दिले. येत्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर इव्हीएम मशीनमध्ये छेडछाड होऊ शकते, पक्ष या बाबींकडेही लक्ष देईल असेही त्यांनी नमूद केले. राज्यातील भ्रष्टाचारावर बोलताना जयंत पाटील म्हणाले की ज्याप्रमाणे अलिबाबा आणि चाळीस चोर होते त्याप्रमाणेच आपल्या राज्यात मुख्यमंत्री आणि त्यांचे २२ मंत्री आहेत. राज्यातील मंत्री भ्रष्टाचार करतात आणि मुख्यमंत्री त्यांची पाठराखण करतात असं धोरण सध्या राज्यात राबवले जात आहे अशी टीका त्यांनी केली. भाजप सूडबुद्धीचे राजकारण करत आहे. ज्येष्ठ नेते भुजबळ यांनाही सूडबुद्धीने अटक करण्यात आली होती. मात्र आता भाजपवर तोंडावर पडण्याची वेळ आली आहे असा टोलाही त्यांनी लगावला.

या फेसबुक लाईव्हदरम्यान प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी अहमदनगर येथील हत्याकांड, राज्यातील पोटनिवडणुका, सोशल मीडियाचा वाढता प्रभाव, शेतकऱ्यांची कर्जमाफी, सहकार चळवळ आणि राज्यातील इतर मुद्द्यांवरही भाष्य केले.यावर अधिक वाचा :

ऑडी ए6 चा लाईफ स्टाइल अॅडिशन लॉन्च, कारमध्ये उपलब्ध होईल ...

national news
जर्मनीची लक्झरी कार निर्माता ऑडीने मंगळवारी, त्याची सेडान कार ए6 चा लाईफ स्टाइल अॅडिशन ...

जागतिक महिला दिन: पीएम मोदींचा नारी शक्तीला सलाम, पोस्ट ...

national news
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जागतिक महिला दिनच्या निमित्ताने महिलांना केले आणि शुभेच्छा ...

जागतिक महिला दिन विशेष : वाट खडतर... तरीही आज सक्षम मी

national news
बँकेतील अधिकारीपदावरील नोकरी व त्यानंतर चांगल्या घरात झालेल्या विवाह, असे सारे काही उत्तम ...

सेक्स लाईफसाठी वाईट आहे या 7 सवयी

national news
– खास करून महिला, आपल्या पार्टनरसोबत सेक्सबद्दल बोलताना टाळण्याचा प्रयत्न करतात. कारण ...

शरीरातील या 10 भागांवर तीळ, सांगतात धनयोगाबद्दल

national news
शरीरातील 10 स्थान असे आहे जेथे तीळ असायचा स्पष्ट अर्थ आहे की तुम्हाला कधीपण पैशांचा अभाव ...

धमाकेदार फीचर्ससह लॉचं झाली Yamaha MT-15

national news
बाइक चाहत्यांसाठी भारतीय बाजारात इंडिया यामाहा मोटर (आयवायएम) प्राइवेट लिमिटेडची नवीन ...

आता आवडते गाणे फेसबुकवर शेअर करू शकता

national news
बऱ्याचदा आपण एक गाणे ऐकत असता किंवा आपल्याला एखादं गाणं खूप आवडत. तेव्हा आपल्याला असे ...

शेवटच्या घावात दगड तुटतो..

national news
शेवटच्या घावात दगड तुटतो..

राज ठाकरे यांची लोकसभेतून माघार १९ मार्चला मांडणार कारणे

national news
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने 2019 च्या लोकसभा निवडणुकीतून अधिकृत रित्या माघार घेतली असून, ...

मनोहर पर्रीकर यांच्या बद्दल हे सर्व महत्वाचे आयआयटी आमदार ...

national news
गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांचं दीर्घ आजाराने निधन झालं आहे. मनोहर पर्रिकर यांनी ...