1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मुंबई , गुरूवार, 3 मे 2018 (11:39 IST)

शिवसेना-भाजप विधानपरिषदेसाठी एकत्र

bjp shivsena
आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुका स्वबळावर लढण्याचे शिवसेनेने जाहीर केले असले तरी विधानपरिषद निवडणूक भाजपसोबत युती करून लढविण्याचा निर्णय शिवसेनेने घेतला आहे. त्यामुळे दोन्ही पक्ष आगामी लोकसभा-विधानसभा निवडणुकाही एकत्र लढविणार का? याकडे राजकीय निरीक्षकांचे लक्ष लागले आहे.
 
शिवसेना-भाजपने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सहा जागांच्या विधानपरिषद निवडणुकांसाठी 50-50 चा फॉर्म्युला निश्चित केला आहे. त्यामुळे शिवसेना आणि भाजप प्रत्येकी तीन जागांवर लढणार आहे. या तीन पैकी नाशिक, रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग आणि परभणी-हिंगोलीतून शिवसेनेचे उमेदवार उभे राहणार आहेत. तर उसनाबाद-लातूर-बीड, अमरावती आणि वर्धा-चंद्रपूर-गडचिरोलीतून भाजप लढणार आहे. विशेष म्हणजे विदर्भातील दोन्ही जागा शिवसेनेने भाजपला सोडल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. अमरावतीतून भाजपचे उमेदवार प्रवीण पोटे-पाटील यांचा अर्ज दाखल झाला आहे. उस्मानाबाद-लातूर-बीडमधून सुरेश धस यांना उमेदवारी दिली आहे.