शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. लोकप्रिय
Written By

आता ट्रॅफिकमध्ये देखील नंबर वन होण्याच्या तयारीत इंदूर, हवाई सुंदरींनी घेतली कमांड

इंदूर- मध्यप्रदेशातील इंदूर हे शहर स्वच्छतेत तिसर्‍यांदा नंबर वन झाल्यानंतर आता ट्रॅफिकमध्ये नंबर वन होण्याचा प्रयत्न करत आहे. शहरातील वाहतूकीची व्यवस्था सुधारण्यासाठी वाहन चालकांना जागरूक करण्यात भिडलेल्या पोलिसांनी एक आगळावेगळा प्रयोग केला आहे. हा प्रयोग बघून नगरवासीदेखील हैराण झाले. कारण रस्त्यावर एक-दो नव्हे तर अनेक हवाई सुंदरींनी गर्दी असलेल्या चौरस्त्यावर उभे राहून आपल्या अंदाजात वाहन चालकांना रहदारीचे धडे शिकवले.
 
एअर होस्टेस ट्रेनिंग इंस्टिट्यूटच्या 70 विद्यार्थ्यांनी रीगल, विजय नगर, रेडिसन सह अनेक चौरस्त्यांवर वाहन चालकांना त्यांच्या इशार्‍यात समजूत दिली ज्या प्रकारे विमानात देण्यात येते. जसे.... कृपा करून सीट बेल्ट बांधावे... दुचाकी वाहन चालकांनी हेल्मेट घालावे.. ट्रॅफिकचे नियम पाळावे... वाहन चालवताना मोबाईल वापरू नये असे निर्देश देण्यात आले.
 
या दोन दिवसीय अभियानाचा उद्देश्य लोकांना सहजपणे वाहतूक नियमांचे पालन करण्याची सवय लागावी असे आहे.
 
येथे कारवाई केली जाणार नाही
सुव्यवस्थित वाहतुकीसाठी इंदूर पोलिसांनी एक वेगळा पुढाकार घेतला आहे. पोलिस रीगल ते पलासिया चौरस्ता या भागाला आनंदी मार्ग असे म्हणत आहे. येथे नियम न पाळणार्‍यांवर कारवाई केली जाणार नाही, त्यांना दंड देखील भुगतावे लागणार नाही त्यांना केवळ खासगी कंपनीचे वॉलेंटियर नियमांचे पालन करण्याची समजूत देतील.