गुरूवार, 28 मार्च 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. लोकप्रिय
Written By
Last Modified: मंगळवार, 10 एप्रिल 2018 (14:31 IST)

एआय तंत्रज्ञान करू शकते एलियनचा शोध घेण्यास मदत

पृथ्वी व्यतिरिक्त अन्य ग्रहांवर जीवसृष्टीचा शोध घेत असलेल्या खगोलशास्त्रज्ञांसाठी आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय) म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्ता प्रणाली साहाय्यक ठरू शकते. 
 
एका ताज्या अध्ययनातून हे समोर आले आहे. ब्रिटनमधील प्लायमाउथ विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांनी कृत्रिम  बुद्धिमत्तेवर आधारित असलेल्या एका कृत्रिम तंत्रिका नेटवर्कचा (एएनएन) वापर करून ग्रहांचे पाच श्रेणींमध्ये वर्गीकरण केले आहे. हे वर्गीकरण सध्याची पृथ्वी, प्रारंभीच्या काळातील पृथ्वी, मंगळ, बुध वा शनीचा चंद्रा टायटनच्या आधारे करण्यात आली आहे. प्रत्येक बाबतीत जीवसृष्टीच्या शक्यतेचा अंदाज बांधण्यात आला आहे. 
 
या सगळ्या स्थानांवर वातावरण असून सौरमालिकेतील जीवनासाठी ही स्थाने सर्वाधिक अनुकूल आहेत. प्लायमाउथ विद्यापीठाच्या प्राध्यापक क्रिस्टोफर बिशप यांच्या माहितीनुसार, सध्या शास्त्रज्ञांची रुची एक काल्पनिक, बुद्धिमान, सौरमालिकेत अस्तित्वात असलेल्या ग्रहांचे विश्र्लेषण करणार्‍या अंतराळ यानाला प्राथमिकता देण्यासाठी या कृत्रिम तंत्रिका नेटवर्कमध्ये आहे. भविष्यात रोबोटिक अंतराळ यानामध्ये औद्योगिक उपयोगाची आवश्यकता भासल्यास त्याची गरज पडेल. कृत्रिम तंत्रिका नेटवर्क अशी प्रणाली आहे, जी मानवी मेंदूप्राणे समजून घेण्याचा प्रयत्न करते. लीव्हरपूलमधील युरोपियन वीक ऑफ स्ट्रोनॉमी अँड स्पेस सायन्समध्ये हे अध्ययन प्रसिद्ध झाले आहे.