1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. लोकप्रिय
Written By
Last Modified: शुक्रवार, 3 ऑगस्ट 2018 (15:49 IST)

सर्वात श्रीमंत कंपन्यांमध्ये ॲपल पहिले

ॲपल कंपनीचे बाजारमूल्य ६८ हजार ६२० अब्ज रुपये इतके झाले आहे. याबाबतची माहिती ॲपलकडून जाहीर केली आहे. या माहितीनुसार सर्वात श्रीमंत कंपन्यांमध्ये ॲपलने पहिले स्थान पटकावले आहे. ॲपलची मालमत्ता ही भारताच्या अर्थव्यवस्थेच्या ३८ टक्के इतकी आहे. यावरुन कंपनीच्या मालमत्तेची कल्पना करता येईल. 
 
आयफोन बनवणारी ही कंपनी पाकिस्तानसारख्या देशाला सहज खरेदी करु शकते. भारतातील सर्वात मोठ्या दोन कंपन्यांहून ॲपलची मालमत्ता १० पटीने मोठी आहे. जागतिक बँकेच्या आकडेवारीनुसार जगातील १९३ देशांपैकी फक्त १६ देशांचा जीडीपी ॲपल कंपनीपेक्षा जास्त आहे. म्हणजेच १७७ देशांपेक्षा ॲपल श्रीमंत आहे. सध्या ॲपल कंपीनचे बाजारमूल्य इंडोनेशियाच्या जीडीपी इतके आहे.
 
ॲपलचे बाजारमूल्य २.८ टक्क्यांनी वाढले आहे. यामध्ये गेल्या चार दिवसांत ९ टक्के वाढ झाली आहे. यापूर्वी शांघायमधील शेअर बाजारात पेट्रोचायनाचे बाजार मूल्य इतके वाढले होते. एक ट्रिलियन डॉलरपर्यंत पोहचणारी ॲपल ही अमेरिकेतील पहिली आणि जगातील दुसरी कंपनी ठरली आहे.