बुधवार, 27 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. लोकप्रिय
Written By
Last Modified: शुक्रवार, 27 मार्च 2020 (15:29 IST)

घरोघरी राम म्हणून पुजले जात होते अरुण गोविल, पण आधी झाले होते रिजेक्ट

90 च्या दशकातील रामायण मालिकेने दर्शकांचे मन जिंकले होते. या मालिकेचा प्रभाव इतका होता की यातील राम आणि सीतेची भूमिका साकारणार्‍या कलाकारांना लोकं रिअल लाईफमध्ये पुजत होते. 
 
अरुण गोविल जेव्हा रामच्या भूमिकेसाठी ऑडिशनसाठी पोहचले होते तेव्हा ते रिजेक्ट झाले होते. कपिल शर्मा शोमध्ये सामील होत असताना त्यांनी ही माहीत दिली होती. त्यांनी सांगितले की मी सागर प्रॉडक्शनमध्ये विक्रम-बेताल मालिकेत होतं तेव्हा मला रामानंद सागर हे रामायण तयार करत आहे कळल्यावर मी राम या भूमिकेसाठी ऑडिशनसाठी गेलो होता. मी ऑडिशन दिल्यावर त्यांनी मला बघताच नकार दिला. नंतर काही दिवसांनी मला फोन करून बोलवण्यात आले आणि तिथे पोहचल्यावर मला सांगितले गेले की सिलेक्शन कमिटीप्रमाणे माझ्याहून चांगला राम मिळू शकत नाही.
 
रामच नव्हे तर सीतेची भूमिका करणारी दीपिका चिखलियासोबत देखील असेच काही घडले होते. त्यांनी सांगितले की मी प्रॉडक्शनसाठी काम करताना मला अचानक सीतेच्या ऑडिशनसाठी बोलवणं आलं. तेव्हा दीपिकाने म्हटले की मी आधीपासूनच इतर मालिकेत काम करत असून ऑडिशनची गरज का भासावी तेव्हा त्यांना सांगण्यात आले की सीता अशी हवी की दर्शकांना दर्शवण्याची गरज न भासावी अर्थात चार बायका सोबत असल्या तरी सीतेला दर्शकांनी सहजच ओळखायला हवे. नंतर चार-पाच वेळा स्क्रीन टेस्ट झाल्यावर फायनली दीपिकाच्या पदरी भूमिका पडली.