बुधवार, 17 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. लोकप्रिय
Written By
Last Updated : शनिवार, 14 एप्रिल 2018 (10:04 IST)

भीम अॅप वापरणा-यांना कॅशबॅकची ऑफर

डिजीटल व्यवहार करण्यासाठी सरकारने सुरु केलेले भीम अॅप वापरणा-यांना आजपासून कॅशबॅकची ऑफर मिळणार आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना समर्पित करण्यात आलेल्या या अॅपच्या माध्यमातून कॅशबॅक योजनांचा लाभ ग्राहकांना मिळणार आहे. या कॅशबॅकच्या ऑफरमधून ग्राहकांना महिन्याला साडेसातशे रुपये आणि व्यावसायिकांना हजार रुपयांपर्यंत कॅशबॅक मिळू शकणार आहे.
 

आंबेडकर जयंतीनिमित्ताने बाबासाहेब भीमराव आंबेडकर यांना भीम अॅप समर्पित करण्यात आलेय. आंबेडकर जयंतीनिमित्ताने ही कॅशबॅक ऑफर लागू करण्यात आली आहे. भीम अॅप आर्थिक व्यवहारांसाठी आणि डिजिटल व्यवहारांसाठी प्रोत्साहन देण्यासाठी भारत सरकारने सुरु केलेय. आर्थिक व्यवहारांसाठी इंडियन नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन, भारत सरकारद्वारे सुरू केलेला एक उपक्रम आहे. भीम अॅपच्या कॅशबॅक ऑफरमध्ये ग्राहक महिनाभरात ७५० रुपये कॅशबॅक मिळवू शकतात आणि व्यापारी एक महिन्यासाठी १,००० रुपये कॅशबॅक मिळवू शकतात.