शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. लोकप्रिय
Written By
Last Modified: सोमवार, 6 ऑगस्ट 2018 (15:27 IST)

घोळ माशाच्या बोथला चक्क साडे पाच लाखांची किंमत

पालघर तालुक्यातील मुरबे गावातील एका मच्छिमाराच्या जाळ्यात सापडलेल्या घोळ माशाच्या ७२० ग्रॅमच्या बोथला (फुफ्फुसांची पिशवी) चक्क पाच लाख ५९ हजार रुपये मिळाले आहेत. आतापर्यंत सर्वाधिक दराने खरेदी करण्यात आलेले घोळ माशाचे बोथ ठरले आहे. हा आतापर्यंतच्या खरेदीचा उच्चांक असून सध्या सोशल मीडियावर चर्चेचा ठरत आहे.
 
मासे पकडण्यासाठी गेलेल्या श्री साई लक्ष्मी या बोट मालकाच्या बोटीच्या जाळ्यात हा घोळ मासा आला आहे. दाढा, घोळ या माशांमध्ये त्यांच्या पोटातील बोथला चांगला भाव मिळतो. वाम, कोत, शिंगाळा या माशांच्या बोथलाही चांगली मागणी असते. उत्तर प्रदेश, बिहार राज्यातून जिल्ह्यात स्थायिक झालेल्या व्यापाऱ्यांकडून हे बोथ खरेदी केले जातात. घोळ माशाच्या मांसाला ८०० ते १ हजार रुपये प्रति किलो दर मिळत असला तरी नर जातीच्या बोथला सर्वाधिक मागणी आहे. तर मादी जातीच्या बोथला ५ ते १० हजार पर्यंत किंमत मिळते. घोळ माशांच्या बोथाचा वापर औषध निर्मितीसाठी आणि सूप बनविण्यासाठी केला जातो. ऑपरेशनचे धागे बनविण्यासाठी वारण्यात येणाऱ्या बोथला चांगला दर मिळतो. अशा बोथला आंतरराष्ट्रीय बाजारातही मोठी मागणी आहे.