मंगळवार, 28 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. लोकप्रिय
Written By
Last Modified: गुरूवार, 28 जानेवारी 2021 (11:54 IST)

चॉकलेट खा, पैसे कमवा, त्वरा अर्ज करा

चॉकलेट खाणं कोणाला आवडत नाही, लोक चॉकलेट खाण्याचे बहाणेच शोधत असतात आणि त्यावरुन चॉकलेट फ्रीमध्ये मिळत असेल तर विचारुच नका. पण आता आपल्याला म्हटले की आपण चॉकलेट खा आणि पैसे कमवा तर आपल्याला आश्चर्यच वाटेल पण ही बातमी चॉकलेट प्रेमींसाठी एक खुशखबर आहे कारण आता चॉकलेट खाण्यासाठी पैसे मिळत आहे.
 
एका कंपनीने ही जॉब ऑफर केली आहे ज्यात चॉकलेटची चव सांगणाऱ्या व्यक्तीला भला मोठा पगार देखील दिला जाणार आहे. कॅंडी फनहाऊस या कंपनीने हा हटके जॉब ऑफर केला आहे. ही कंपनी कॅनडातील शहरात असून या जॉबची खासियत म्हणजे जगात तुम्ही कुठेही असाल तरी या कंपनीसाठी काम करू शकता आणि पैसे कमावू शकता. या कंपनीला फुल टाइम आणि पार्टटाईम कर्मचारी हवे आहेत जे कंपनीने तयार केलेली ट्रॉफीज खाऊन त्याच्या चवीची माहिती या जगाला देऊ शकतील.
 
कंपनीने यासाठी खास जाहिरात दिली आहे. या जाहिरातीनुसार कंपनीला कँडिओलॉजिस्ट या पदासाठी लोक हवे आहेत. कंपनीने तयार केलेल्या चॉकलेटची चव सांगण्यासाठी पगार दिला जाणार आहे. कंपनीने आपल्या जाहिरातीत दिलेल्या माहितीनुसार निवडलेल्या उमेदवाराला कंपनी एका तासासाठी 47 डॉलर देणार आहे अर्थात आठ तास काम करणार्‍यांना 376 डॉलर्स मिळू शकतात. म्हणजे दिवसाला तुम्ही 27447 रुपये कमवू शकता.
 
विशेष म्हणजे हे काम आपण घर बसल्या करु शकता. कंपनीने तयार केलेले प्रॉडक्ट टेस्ट करून यामध्ये काय चांगला आहे काय वाईट आहे ते सांगायचं आहे तसेच यामध्ये कोणत्या प्रकारच्या फ्लॉवरचा वापर केला जाऊ शकतो हे ही देखील तुम्हाला सांगायचं आहे.
 
कॅंडी फनहाऊसने आपल्या वेबसाईटवर या जॉब ची ऑफर दिली आहे यासाठी अर्ज करण्यासाठी मुदत 15 फेब्रुवारीपर्यंत आहे. कंपनीच्या वेबसाईटवर जाऊन तुम्ही नोकरीसाठी अर्ज करू शकता.