सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. लोकप्रिय
Written By
Last Modified: रविवार, 10 मे 2020 (10:25 IST)

चला कोरोनासोबत सेल्फी घेऊ या !

गुजरातमध्ये लोक ‘कोरोना’बरोबर सेल्फी घेतांना दिसत आहे. कारण हा कोणताही जीवघेणा व्हायरस नाही तर गुजरातमध्ये असणाऱ्या हॉटेलचे नाव आहे.  
 
गुजरातमध्ये बनासकांठा या ठिकाणी कोरोना नावाच एक हॉटेल आहे. राजस्थान सीमेवरील असलेल्या अमीरगडमधील कोरोना नावाच्या हॉटेलला पाहून लोक आश्चर्यचकीत झाले आहेत. गुजरातमधील बनासकांठाच्या सीमेवर असणाऱ्या या कोरोनाची सुरुवात २०१५ मध्येच झाली होती.
 
दरम्यान सध्या लॉकडाऊनमुळे हे हॉटेल बंद आहे. पण कोरोना नावामुळे लोकं आता हॉटेलसमोर उभे राहून त्यांचे फोटो आणि सेल्फी घेण्यासाठी चांगलीच गर्दी करताना दिसताय. लोकांमध्ये हे कोरोना आकर्षणाचा विषय ठरले आहे. त्यामुळे कोरोना हॉटेल हे आता सेल्फी पॉईंट बनले आहे. कोरोना हॉटेल सुरू करणारे मालक बरकतभाई हे उत्तर गुजरातमधील सिद्धपूरचे रहिवासी आहे.