लसीमुळे शरीरांमध्ये चुंबकत्व निर्माण होण्याच्या दावा फोल : महाराष्ट्र अंनिसचे सत्यशोधन
कोरोना प्रतिबंधक लशीचा दुसरा डोस घेतल्यानंतर शरीराच्या चेहरा, मान,खांदे, हात या अवयवांच्या त्वचेला चमचे, नाणे,उचटणी,लहान ताटली अशा प्रकारच्या वस्तू चिकटतात, अशी घटना नाशिकमध्ये घडली. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन, यामागील सत्यशोधन करण्याचा प्रयत्न केला.
चमचे, नाणे ,उचटणे अशा प्रकारच्या वस्तू सदर व्यक्तीच्या चेहर्यावर पासून तर मानेपर्यंत हाताच्या त्वचेवर चिकटतात असे दिसून आले. मात्र शरीराच्या त्वचेतील दमटपणा आणि हे वस्तूच्या बाह्य पृष्ठभागावरील सूक्ष्म खाचखळगे व त्वचेचा दमटपणा याच्यामध्ये हवेचा पापुद्रा पातळ असतो.थोडयाशा दाबाने हवेचा दाब कमीत कमी झाल्यावर त्वचा आणि ती वस्तू एकमेकाला चिकटतात. मात्र सूरीसारखी गुळगुळीत सपाट पृष्ठभाग असलेली वस्तू चिकटत नाही. असे दिसून येते.हे कुणी ही करून पाहू शकते. एवढेच नव्हे तर समितीच्या कार्यकर्त्यांनी मोठे ताट देखील त्वचेचा चिकटते हे सुद्धा लगेच दाखवून, तशा प्रकारचे व्हिडिओ तयार करून, ते तात्काळ प्रसारीत केलेले आहेत.
तेव्हा लसीकरणामुळे अंगामध्ये चुंबकत्व निर्माण होते, याच्यावर कोणीही विश्वास ठेवू नये. प्लॅस्टीकची वस्तू सुद्धा अंगाला चिटकते , यामुळे चुंबकत्व निर्माण झाले हा दावा फोल ठरतो. खुद्द त्या व्यक्तीनेही तसा दावा केलेला नाही. उलट यामागचे शास्त्रीय कारण शोधावे असा आग्रह धरला आहे. आरोग्य विभागानेही याबाबत वैद्यकीय सत्य लवकरात लवकर समाजापुढे आणावे आणि लसीकरणा बद्दल कोणीही अफवा पसरू नये, सर्वांनी लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने सर्वांना करण्यात आलेले आहे. अशी माहिती समितीचे कार्यकर्ते डाॅ. ठकसेन गोराणे, कृष्णा चांदगुडे,नितीन बागुल यांनी केले आहे.