testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2

देशातील पहिले इंसेक्ट अॅण्ड बायोडायवर्सिटी फेस्टिवल

insects
‘किटक’ हा पर्यावरणातील सर्वात महत्वाचा घटक आहे. मात्र याबाबत समाजात अनेक गैरसमज आणि चुकीची माहिती पसरलेली आहे. निसर्गात मनुष्य महत्वाचा आहे. तितकेच कीटकही महत्वाचे आहे. या गोष्टीचा आता विसर पडलेला आहे. हीच गरज ओळखून रोटरी क्लब ऑफ नाशिक, नॉर्थ आणि ग्रेप काउंटी बायोडायवर्सिटी पार्क यांच्या संयुक्त विद्यमाने देश आणि राज्यातील पहिला अर्थात किटक आणि जैव विविधता महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. येत्या १२ ऑगस्ट २०१८ रोजी त्र्यंबकेश्वर रोड, अंजनेरी, नाशिक
येथील ग्रेप काउंटी बायोडायवर्सिटी पार्क येथे सकाळी ८.३०
वाजता हा महोत्सव होत आहे. याबाबतची माहिती रोटरी क्लब ऑफ नाशिक नॉर्थचे अध्यक्ष मनिष ओबेरॉय आणि ग्रेप काउंटीचे संचालक किरण चव्हाण यांनी दिली आहे.

या उपक्रमाच्या यशस्वितेसाठी तेजस चव्हाण, अक्षय धोंगडे, रोटरी क्लब ऑफ नाशिक नॉर्थचे सदस्य राजेश पंचाक्षरी, सुशांत जाधव, हितेश पगार, महेश गाडेकर, राजेंद्र धारणकर यांनी मेहनत घेतली आहे. सोबतच या उपक्रमासाठी शहरात असलेले रोटरीचे १६ क्लब यांनीही पुढाकार घेतला आहे.देशात आणि राज्यात पहील्यांदाच होत असलेल्या या नाविन्यपूर्ण इंसेक्ट अॅण्ड बायोडायवर्सिटी फेस्टिवला या विषयातील तज्ञ मंडळी मार्गदर्शन करणार आहेत. यावेळी मधुमक्षिका तज्ञ टी.बी. निकम, फुलपाखरू आणि पक्षी तज्ञ डॉ. श्रीश क्षीरसागर आणि
किटक तज्ञ अभिजित महाले मार्गदर्शन करणार आहेत. यावेळी मधुमक्षिका तज्ञ टी.बी. निकम सदरच्या विषयावरील माहितीटाचे सादरीकरण करून संपूर्ण माहिती देणार आहेत.

इंसेक्ट अॅण्ड बायोडायवर्सिटी फेस्टिवलमध्ये निसर्गात असलेले पक्षी, किटक, वनस्पतीशास्त्र यांची माहिती दिली जाणार आहे. यावेळी शक्यता आहे की पक्षी आणि किटक दिसू शकतात. त्यामध्ये ब्लॅक ड्रँगो, पेड बुशचॅट, जंगल मायना, ब्राह्मणि माइना, क्रेस्टेड लार्क, रुफस टेल लार्क, मॅग्पी रॉबिन, इंडियन रॉबिन, पर्पल सनबर्ड, रेड वॅटलेड लॅपिंग, लाफिंग डोव, एग्रीट्स आणि हेरॉन्स, किंगफिशर्स यांसारखे पक्षी, जसे शिकार करणारे देखील पक्षी येथे आढळू शकणार आहेत. सोबतच निसर्गाने साथ दिली तर क्वचित दिसणारे इंडियन कोर्टर्स, पिवळ्यासारखे काही पक्षी, लॅपिंग, ग्रे फ्रँकॉलिन, बुश लाव पक्षी, काही ईगल प्रजाती आदीची उपस्थिती पहायला मिळू शकते.

याशिवाय विविध प्रकारचे किटक ग्रासहूपर, कॅटेडीडस, बीटल्स, ड्रॅगनफ्लाईज, डॅमस्लिज, बग्स, विविध फुलपाखरे, पतंग, वृक्षापोटी, मुंग्या, हनीबीज, वापास, प्रीईंग मांटिस,
वोकिंगस्टिक, वॉटर स्ट्रर्ड, एंटलायन, क्रिकट आणि काही इतर प्रकारचे माश्या, ऍफिड्स , सुरवंट आणि फुलपाखरे आणि किडे यांच्या अळ्या देखील पाहता येणार आहेत.

“रोजच्या धावपळीच्या जीवनात आपण निसर्गापासून दुरावलो आहोत. रोज दिसणाऱ्या अनेक माश्या, किटक, मुंग्या, पक्षी, वनस्पती यांची मुळीच माहिती आपल्याला नसते.
त्यांच्या जाती, रंग, पर्यावरणातील त्यांचे महत्व आदी गोष्टी समजून घेण्यासाठी हा उपक्रम रोटरी क्लब तर्फे राबविण्यात येत आहे. लहान मुलांप्रमाणेच मोठ्यांना सुद्धा याबाबत योग्य माहिती मिळून पर्यावरण जनजागृती, संवर्धनासाठी लोकांनी सहभाग वाढवावा आणि
त्यांना या किटकांची खरी माहिती मिळावी हा या महोत्सवा मागचा मुख्य उद्देश आहे”. – मनिष ओबेरॉय, अध्यक्ष, रोटरी क्लब ऑफ नाशिक नॉर्थ.यावर अधिक वाचा :

PUBG गेम आपल्याला पोहोचवू शकतो हॉस्पिटलमध्ये

national news
व्हिडिओ गेम PUBG बद्दल आपल्याला माहिती असेलच परंतु आपल्याला कदाचित याच्या वाईट ...

प्रजास्ताक दिनाचा इतिहास

national news
भारताला ब्रिटीश राजवटीपासून १५ ऑगस्ट १९४७ ला स्वातंत्र्य मिळाले. यामागे भारताचा ...

सर्वोच्च न्यायालयाकडून शिवस्मारकाचे काम थांबविण्याचे आदेश

national news
शिवस्मारकाचे काम थांबविण्याचे तोंडी आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिल्यानंतर सार्वजनिक ...

डाउनलोड स्पीडमध्ये रिलायंस जिओ अव्वल

national news
गेल्या वर्षभरात 4जी डाउनलोड स्पीडच्या बाबतीत जिओने अव्वल क्रमांक गाठलाय. 2018 मध्ये जिओ ...

मायक्रोसॉफ्ट Windows 7 चा सपोर्ट बंद करणार

national news
प्रसिद्ध कंपनी मायक्रोसॉफ्टने Windows 7 चा सपोर्ट बंद करण्याची तयारी केली आहे. विंडोज ७ ...

मुलाच्या आत्महत्येची बातमी ऐकून आईने केली आत्महत्या

national news
लातूरच्या निलंगा तालुक्यातील निठुर येथे मुलाने आत्महत्येची बातमी ऐकून आईनेही आत्महत्या ...

विकृती :महिलांवर रासायनिक पदार्थाने हल्ला करणारा गजाआड

national news
मुंबईत काही दिवसांपासून पश्चिम रेल्वे मार्गावरील अंधेरी रेल्वे स्थानकात महिलांवर ...

मुंबईत रेल्वेचा मेगाब्लॉक, वाहतुकीत मोठा बदल

national news
पश्चिम, हार्बर रेल्वेवर देखभाल आणि दुरुस्तीसाठी आणि मध्य रेल्वेवर परळ टर्मिनसकडील नवीन ...

भुजबळ यांची टीका : अबकी बार छम छम सरकार

national news
माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी डान्सबारप्रकरणी आपल्या अनोख्या शैलीत सत्ताधारी भाजपवर ...

खोटी गुणवत्ता सांगणारी शिक्षणपद्धती बंद : विनोद तावडे

national news
राज्यातल्या शिक्षण विभागाकडून डॉ. रघुनाथ माशेलकर, डॉ. अनिल काकोडकर, डॉ. विजय भटकर, सोनम ...