शनिवार, 28 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. लोकप्रिय
Written By
Last Modified: शुक्रवार, 11 मे 2018 (14:58 IST)

आयर्न मॅनचा महागडा सूट गेला चोरीला

जगाला वाचवत असलेल्या सुपर हिरोचा सुटच चोरीला गेला आहे.अॅव्हेंजर्सची या सुपरहिरोंपैकी एकाचे कपडे चोरीला गेले आहेत. हॉलिवूड सिनेमातील सुपरहिरो आयर्न मॅनचा खराखुरा सूट चोरीला गेला आहे. त्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. याबाबत अमेरिकेतील लॉस एंजेलिस पोलिसांनी  हे वृत्त खरे आहे असे सागितले आहे.  रॉबर्ट डाऊनी ज्युनिअर अर्थात आयर्न मॅनची व्यक्तिरेखा साकारणाऱ्या या अभिनेत्याचा  लाल आणि सोनेरी रंगाच्या सूटची चोरी झाल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे. रॉबर्ट डाऊनी ज्युनिअरने आयर्न मॅनच्या रुपात 2008 मधील 'ओरिजनल सुपरहिरो' सिनेमात हा सूट परिधान केला होता.

 पकोईमाच्या प्रॉप स्टोअरेज फॅसिलिटीमधून हा सूट चोरीस गेला आहे. हा सूट अत्यंत महागडा होता,  या सूटची किंमत 3 लाख 25 हजार डॉलर म्हणजेच तब्बल 2.18 कोटी रुपये इतकी आहे. पण हा सूट फेब्रुवारी ते 25 एप्रिलच्या दरम्यान गायब झाल्याचा दाव, प्रॉप स्टोअरेज फॅसिलिटीमधल्या कर्मचाऱ्यांनी केला आहे.